६/१५/२०१७

पांचगणी

जवळपास महाबळेश्वर इतकेच उंच असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण म्हणजे पांचगणी. महाबळेश्वरपासून हे ठिकाण अवघ्या १८-२० कि.मी. अंतरावर आहे. महाबळेश्वर इतकेच निसर्गसुंदर असलेले हे ठिकाण येथील पब्लिक स्कूल्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात. येथे राहण्या-जेवणाच्या चांगल्या सोयी आहेत. पाच डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झालेलं असल्याने त्यास पाचगणी नाव पडले असावे. लोणावळा-खंडाळा ही ठिकाणं जशी एकमेकांपासून जवळ आहेत तसाच प्रकार महाबळेश्वर-पाचगणी यांच्या बाबतीत आहे. पाचगणीच्या विकासाला महाबळेश्वर हेच मुख्यतः कारणीभूत असले तरीही पाचगणीचं स्वतः असं वैशिष्ट्य आहेच. उत्कृष्ट हवामान आणि संपन्न निसर्ग हे पाचगणीचं वैशिष्ट्य आहे. पाहताना काळजाचा ठोका चुकविणाऱ्या खोल दऱ्या, धबधबे, कमलगड किल्ला, टेबल लँड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रेक्षणीय स्थळं आवर्जून पाहावी अशी आहेत.
सातारा, पुणे, वाई, महाबळेश्वर येथून पांचगणीला एस्.टी. बसने जाता येते.
मुंबई-पांचगणी अंतर : २९५ कि.मी. (पुणे मार्गे)


संदर्भ: www.shivsena.org
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search