६/२०/२०१७

पुरणपोळी

लागणारे साहित्य:
  एक कप चणाडाळ, एक कप किसलेला गूळ,एक कप मैदा,अर्धा कप गव्हाचे पिठ, ८ ते ९  चमचे तेल,एक चमचा वेलचीपूड,कोरडे तांदुळाचे पीठ
.
कसे तयार कराल :
  पाहिलांदा चणाडाळ कूकरमध्ये चणाडाळीच्या अडीचपट पाणी घालून शिजवून घ्यावी, डाळ शिजली कि त्यातील पाणी काढून टाकावे. हे पाणी वापरून कटाची आमटी करता येते.डाळीतील पाणी निघून गेल्यावर हि डाळ पातेल्यात घ्यावे. त्यात किसलेला गूळ घालावा. मध्यम गैस वर  हे मिश्रण आटवावे. आटवताना ढवळत राहावे. जर ढवळायचे थांबवले मिश्रण पातेल्याला लागून करपू शकते. या पुरणात एक  चमचा वेलचीपूड घालावी. मिश्रण घट्टसर झाले कि पातेले गॅसवरून उतरवावे. मिश्रण पुरणयंत्रातून फिरवून घ्यावे.मैदा आणि कणिक मिक्स करून त्यात सहा ते सात चमचे तेल घालावे. आणि  मळून घ्यावे. भिजवलेले पिठ दोन  तास मुरू द्यावे.
  पुरणाचे लहान गोळे बनवून घ्यावे. मैद्याचा अर्धा ते एक इंचाचा गोळा घ्यावा व त्याची पातळसर पारी बनवून घ्यावी. त्यात पुरणाचा गोळा भरावा. सर्व बाजूंनी बंद करून घ्यावा , पोळपाटावर थोडी तांदुळाची पिठी घेउन हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी आणि  तव्यावर भाजून घ्यावी.
 त्यानंतर तूप घालून गरम गरम सर्व्ह करावी
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search