६/१५/२०१७

पोटॅटो चीज स्टफ्ड ब्रेड रोल



लागणारे साहित्य:

बटाटे - २ मोठे,कांदा - १ (बारीक चिरलेला),टोमॅटो - १ (बारीक चिरलेला)
कोथिंबीर,लिंबू - १,चाट मसाला - चवीनुसार,हिरव्या मिरच्या - २ (बारीक चिरलेल्या),चीज - १ क्युब (किसलेला),जिरेपूड - १ लहान चमचा,हळद - अर्धा चमचा,ब्रेड - १ पाकिट (४ स्लाइस),मक्याचं पीठ - पाव किलो,मीठ - चवीनुसार,तेल - २४० ग्रॅम

कृती 

प्रथम बटाटे उकडून घ्या.
उकडलेल्या बटाट्यांची साल काढून ते एकजीव करून घ्या.
त्यात कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, लिंबू ज्युस, जिरेपूड, हळद, मीठ, चाट मसाला टाकून एकत्र करून घ्या.
चीज किसून घ्या व त्याचे लहान गोळे बनवा.
बटाट्याच्या मिश्रणाचे गोळे बनवून त्यात चीजचा गोळा मध्यभागी ठेवून एकत्र गोळा बनवा.
ब्रेड पाण्यात भिजवून घ्या.
 नंतर बटाट्याचा गोळा त्या ब्रेडमध्ये टाका व त्याला गोल आकार द्या.
 नंतर मक्याचं पीठ पाण्यात मिसळा व त्यात थोडे मीठ टाका.
मग ब्रेडचा तयार केलेला गोळा मक्याच्या भिजवलल्या पिठात बुडवून गरम तेलात तळून घ्या.
गरमागरम टेस्टी ब्रेड रोल तय्यार...






संदर्भ: Maharashtra Times
लेखक :शेफ अमोल राऊळ
एक्झिक्युटिव्ह शेफ, अतिथी स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट




Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search