७/१४/२०१७

या पोरी म्हणजे


या पोरी म्हणजे पोरीच असतात,

कधी गोड बुंदी कधी तिखट कचोरी असतात...
जाणून घ्यायला थोड्या कठीणच असतात
सुंदर दिसणाऱ्या आपल्या नशिबात नसतात...
ज्यांना आपल्यात इंटरेस्ट
अश्या थोड्या कमीच असतात,
आपल्याला आवडणाऱ्या सहसा आधीच एंगेज
असतात...
नखरे ह्यांचे तसे खूप असतात,
पक पक पक पक यांच्या तोंडाला टाळे
नसतात,
आमच्या मनात टपरीवरची रु.५ ची कटिंग,
त्या मनात कॅफे डे ची रु.२५ ची कॉफी घेऊन
असतात...
सांभाळतात आम्हाला म्हणून
त्यांना गुन्हे सगळे माफ असतात,
पण काही हि म्हणा....या पोरी एकदम
भारी हसतात...
घायाळ करतात....परवानगी न घेता एकदम
मनात बसतात..

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search