नमस्कार मित्रांनो,
मी मराठी माझी मराठी ह्या आपल्या लाडक्या वाचक सांकेतिक स्थळावर एक नवीन विंडो ओपन करत आहोत , ' एकांकिका '. ह्या विंडोच मुख्य उद्दिष्ट आहे, ते म्हणजे एकांकिकेच्या संहिता जास्तीत जास्त लोकं, कलाकार, दिग्दर्शक, ई. रंगकर्मीं पर्यंत पोहचावे आणि हौशी, तसेच प्रायोगिक रंगभूमी हे एका छता खाली यावे हि भावना आहे.
ह्या विंडो मध्ये लेखकांनी आपल्या एकांकिका प्रकाशित कराव्यात आणि जर का कोणानाट्य संस्थेला ती सादर करायची असेल तर ती संस्था आणि ते संबंधित लेखक हे परस्पर चर्चा करू शकतात, आणि प्रयोग निर्मिती करू शकतात. सेंसॉरच्या आवश्यक ती काळजी संबंधित लेखकाची असेल.
आमचं ह्या संकेत स्थळावर विविध लेख, कथा, कविता, कादंबरी पाठवणाऱ्या इतर लेखकांना हि आव्हाहन आहे कि, त्यांनीही ह्या सदरासाठी लिहिण्याचा प्रयत्न करावा, आणि ह्या हौशी, प्रायोगिक नाट्य चळवळीचा एक भाग होण्यासाठी तयार व्हावं.
नोट :- कृपया संहिता सेन्सर झाल्या शिवाय ह्या विंडो वर प्रकाशित करण्यास पाठवू नये. एकांकिका पाठवतांना लेखकाचे हमी पत्र पाठवणे बंधनकारक आहे, जे संहिता हि सेंसॉर असल्याचं प्रमाण असेल. त्याशिवाय एकांकिका प्रकाशित केली जाणार नाही.
अधिक माहिती साठी किंवा शंकानिरसन करण्यासाठी, निसंकोच पणे विचारा. आणि हा नवीन उपक्रम कसा वाटतो ह्या बद्दलही कळवा. आपला अभिप्राय आणि मार्गदर्शन मोलाचं आहे.
आशा आहे कि आपण आपल्या नाट्य लिखाणाला जगभर पोहचवण्यास उत्सुक असाल. आणि आम्हाला हि बहुमूल्य संधी द्याल.
धन्यवाद !!!
रोहित सुर्वे
+91 99676 63630
रिव्हिव्ह टीम
मी मराठी माझी मराठी!!!