७/०९/२०१७

… तो बाप असतो
बाळंतपण झाल्यावर ,धावपळ करतो
औषध घेतो ,चहा,कॉफ्फी आणतो
पैश्याची जुळवाजुळव करतो
………………..तो बाप असतो

सगळ्यांना ने आण करतो

स्वयंपाक हि करतो
सिजरीन नंतर बायकोला त्रास नको ,
म्हणून बाळ रडलं तर रात्र भर जागतो
…………………………….तो बाप असतो

चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो

डोनेशन साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
…………………………..तो बाप असतो

कॉलेज मध्ये सोबत जातो,होस्टेल शोधतो

स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
……………………………..तो बाप असतो

स्वतः टपरा मोबाईल वापरून,तुम्हाला stylish मोबाईल घेऊन देतो

तुमच्या प्रीपेड चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो
………………………………तो बाप असतो

love marriage करायला कोणी निघाल तर खूप चिडतो

“सगळ नीट पाहिलं का?” म्हणून खूप ओरडतो
“बाबा तुम्हाला काही समजत का? “अस ऐकल्यावर खूप रडतो
………………………………तो बाप असतो

जाताना पोरगी सासरी,धायमोकळून रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो

…………….तो बाप असतो

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search