लागणारे साहित्य:
दोन वाट्या छोले,चार कांदे,दोन टमाटे,दोन वाट्या दही, दोन वाट्या कणिक, दोन वाट्या मैदा ,मीठ चवीनुसार,एक चमचा छोले मसाला, तिखट चवीनुसार,थोडेस सुके खोबरे,एक छोटा तुकडा आले,पाच टे सहा लसूण पाकळ्या,तेल आवश्यकतेनुसार,कोथिंबीर,पाव चमचा मोहरी ,पाव चमचा जिरे,पाव चमचाकृती हळद.
कसे तयार कराल :
एक रात्रभर छोले पाण्यात भिजत घालावे आणि सकाळी काढावे. दोन कांदे चिरून घ्यावे आणि तव्यावर एक चमचा तेल टाकून चांगले लाल होई पर्यंत भाजून घ्यावे. त्याचप्रमाणे खोबरे हि चिरून भाजून घ्यावे. आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले कांदे, खोबरे, आले, लसूण टाकून बारीक पेस्ट करून घ्यावी. एका परातीत कणिक, मैदा घेऊन त्यात मीठ टाकावे. व दह्याने भिजवावे. आवश्यकता वाटल्यास थोडे पाणी टाकावे. आता हा कणकेचा गोळा कापडाने झाकून ठेवावा. एका छोट्या कुकर मध्ये सहा चमचे तेल घेऊन गरम करावे. मोहरी व जिरे तडतडू द्यावे. मग उरलेले दोन कांदे उभे चिरून टाकावे. परतवून घ्यावे. मग तयार केलेली कांद्याची पेस्ट टाकावी. हळद, तिखट, छोले मसाला टाकावा. टमाटे टाकावे. आता चांगले तेल सुटेपर्यंत परतावे. मग आवश्यकतेनुसार पाणी टाकून छोले टाकावे. व मीठ टाकून कुकरला पाच टे सहा शिट्या घ्याव्यात. छोले शिजले की गैस बंद करून वरून कोथिंबीर टाकावी. एका कढईत भरपूर तेल तापत ठेवावे. तयार कणकेच्या गोळ्याच्या पातळ व मोठ्या पुऱ्या लाटुन दोन्ही बाजूने तळाव्या. छोले भटुरे तयार.
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : स्वप्नाली मोरे