७/२०/२०१७

छत्रपती शिवाजी महाराज


छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की अंगावर सर्रकण काटा उभा राहतो. शरीरामधल्या शिरा आपोआप ताणल्या जातात. छातीचा अपसुक कोट होतो. तर धमण्यांमधील रक्त वेगाने वाहते नव्हे सळसळते. काय त्या नावात जादू. का त्या नाव्यात स्वाभीमान आणि काय त्या नावात सामर्थ्य. अखंड महाराष्ट्रातच नव्हे तर देशात जगात या अलौकीक शिवबांसारखा राजा सापडणे अवघड आहे.

जगामधील साहसी, पराक्रमी, सामर्थ्यशील, धैर्यवान, कर्तूत्वान राजांमध्ये महाराजांचा समावेश आहे. अलेक्सांढर, नेपोलियन, जुलियर्स वगैरे योध्यांएतकेच महाराजांचे कर्तृत्व होते. नव्हे त्यांच्या पेक्षा कितीतरी पटिने जास्त कृर्तत्व शिवबांचे होते.कारण वरील सर्व राजांकडे सैन्य होते. भूभाग होता मात्र महाराजांकडे फक्त राजमात जिजाऊ माँ साहेब यांचे स्वप्न होते.त्यांची शिकवण होती.जो माणूस इतिहास विसरु शकत नाही तोच माणूस इतिहास लिहू शकतो. याच ज्वलंत उदाहरण म्हणजेच आपण शिवरायांकडे पाहायला हवं. जगाच्या पाठीवर सर्व देशांना भुगोल आहे.

मात्र या भारताला या महाराष्ट्राला इतिहास आहे आणि तो इतिहास राजेँच्या मनगटातुन निर्माण झालेला आहे. म्हणजेच शुन्यातुन विश्व निर्माण करणारे दिनदुबळ्यांना न्याय देणारे राजे. हे शिवबाच होऊन गेले.जगातले अन्य राजे आपल्या आयुष्यातील शेवटची निर्णायक लढाई हरले. त्यांच्या पराजीत अवस्थेत अंत झाला असेल. त्याच बरोबर ते राजे अंताला पावल्यानंतर त्यांचे साम्राज्यही लोप पावले आहे.

मात्र सर्वसामन्यातील सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन महाराष्ट्राच्याद-याखो-यात सह्याद्रीच्या कड्या कपा-यातुन एक एक माणूस वेचून काढून ज्या शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केल. ते साम्राज्य वाढलेही, टिकलेही. शिवाजी महाराज युगपुरूष होते. रयतचे तारणहार होते. शिवरायांनी त्यांच्या कारकिर्दीत देशाला स्वराज्याला आणि स्वराज्यातील माणसांना सुरक्षीत ठेवण्यासाठी अनेक नव्या गोष्टी आपलात आणल्या.

देशात पहिले खडे सैनिक राजांनीच उभे केले.त्यांनीच देशातील पहिले नैदल उभे केल.जलदुर्ग उभारला. शिवरायांनीच वतनदारी पध्दत बंद केली.अधिका- यांना,सैनिकांना पगारा सुरु केल्या शेतक- याचा फायदा असणारी रयतवारी पध्दत त्यांनी सुरु केली. शिवाजी राजांच्या बाबतीत बोलायचे झाले तर माणूस संपेल.लिहायच झाल तर कागद शाही पुरणार नाही. आकाश पाताळ एक केल तरी त्यांचा कर्तृत्वाची कहाणीसंपणारी नाही. म्हणूनच राजे रयतेचे राजे होते.. म्हणुनच आपण हा वारसा जपला पाहिजे

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search