८/२२/२०१७

‘भुशी’चा वीकेंड तीननंतर एंड


भुशी डॅम भागात शनिवारी व रविवारी लाखाे पर्यटकांमुळे होणाऱ्याला गर्दी शिस्त लावण्यासाठी शहर पोलिसांनी डॅमसह त्या परिसरात जाण्यासाठी दुपारी तीन वाजल्यानंतर प्रवेश बंद केला आहे. तसेच भुशी डॅमकडे जाण्यासाठी सायंकाळी पाच नंतर प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटकांमुळे लोणावळा भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीचे वृत्त 'मटा'ने सर्वप्रथम देऊन या विषयाला वाचा फोडली होती.

लोणावळा खंडाळा आणि परिसरातील भुशी, लोणावळा, तुंगार्ली, वलवण पवनाधरण ही जलाशये, लोहगड, विसापूर, राजमाची, तुंग, तिकोणा, कोराई हे गड किल्ले, कार्ला, भाजे, बेडसे या प्राचीन लेण्या तसेच टागर, लायन्स, राजमाची, शिवलिंग, सनसेट हे पॉइंट, नागफणी (ड्युक्सनोज) हा सुळक्यासह परिसरातील उंच डोंगरदऱ्यातून कोसळणारे धबधब्यांना भेटण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक येथे येत असतात. पावसाळयात पर्यंटकांची संख्या लाखोंवर जाते.

व्यवसायिकांच्या अडमुठेपणा आणि पालिकेच्या नाकर्तेपणामुळे लोणावळ्यात केवळ पावसाळ्यातच नाही तर इतर दिवशीही वाहतूक कोंडी होते. पावसाळ्यातील दर शनिवार व रविवारी लोणावळा ते भुशीडॅमकडे जाणाऱ्या मार्गावर ८ ते १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागतात. अवघ्या १० ते १५ मिनिटे अवधी लागणाऱ्या भुशीडॅम व परिसरात जाण्यासाठी दोन अडीच तास लागतात. या वाहतूक कोंडीचा फटका जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर होवून याचा पर्यटकांसह स्थानिकांना त्रास सहन करावा लागतो. दर वर्षी विकेंडच्या या दोन्ही दिवशी बंदोबस्त आणि वाहतूक सुरक्षेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करूनही येथील अरुंद रस्ते व रस्त्यावरील अतिक्रमणामुळे तो निष्फळ ठरतो. वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांची दमछाक होते. यासाठी लोणावळा शहर

पोलिस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी भुशीडॅम व त्या परिसराकडे जाणाऱ्या मार्गावर स्थानिकांची वाहने वगळता पर्यटकांच्या वाहनांना दुपारी तीननंतर बंदी घालण्याचा तर भुशीडॅम या ठिकाणी सायंकाळी पाचनंतर पर्यटकांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Times

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search