एका काठीला हवा दोन काठयांचा आधार,
आयुष्य सपंल रित, नाही प्रेमाची उब.
वर्षा मागून वर्ष संपत गेली,
तारूण्याची धुंद डोळयातच उरली.
देह थिजला होता, उर्मी प्रेमाची बाकी होती.
एका काठीला हवा दोन काठयांचा आधार.
पाहाटेच्या रम्य वेळी, झाली तुझी माझी भेट.
तुझ्या रुपेरी केसांनी केले मज मोहीत.
नको बेगडी लिव्ह इन रिलेशन,
हवे आपल्याला लव्ह इन रिलेशन.
थरथरत्या हाताने नको फिरवू,
बिन केसांच्या डोक्यावरी हात.
तुटली जरी कवळी तरी,
चुंबनाचा वर्षाव नक्कीच करिल.
एका काठीला हवा दोन काठयांचा आधार.
खिळखिळया हाडांच्या देहाने
देईल तुला घट्ट अलिगंन,
नको करु पर्वा,झाले जरी फ्रँकचर,
नातू आहे आपला हाडांचा डॉक्टर..