८/१७/२०१७

डहाणू-बोर्डी समुद्रकिनारा


अतिशय सुंदर समुद्रकिनारा लाभलेली ही दोन गावे ठाणे जिल्ह्यात असून येथील समुद्रकिनारा डहाणू ते बोर्डी असा जवळपास १७ कि.मी. लांबवर पसरलेला आहे. फळबागा आणि निसर्ग सौंदर्य यासाठीही हा परिसर प्रसिद्ध आहे.
पश्चिम रेल्वेच्या विरार या लोकल ट्रेनच्या अंतिम स्थानकापासून ही गावं तशी एक तासाच्या अंतरावर आहेत. बोरिवली-विरारपासून डहाणूपर्यंत शटल ट्रेननेही या ठिकाणी जाता येतं. त्या व्यतिरिक्त प. रेल्वेवरील गुजरात व दिल्लीकडे जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या या ठिकाणी थांबतात. मुंबई-अहमदाबाद हायवेनेही या ठिकाणी जाता येतं.
फार पूर्वी मुंबई शहरापासून दूर व समुद्रकाठी वसलेल्या या गावातून पारशी व इराणी लोकांनी वस्ती केली व हा परिसर संपन्न केला. एक दिवसाच्या सहलीसाठी ही ठिकाणं उत्तम आहेत. डहाणूपासून बोर्डी हे गाव सुमारे १७ कि.मी. अंतरावर आहे. बोर्डी हे आदर्श शैक्षणिक केंद्र म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. डहाणूपासून अगदी जवळच असलेल्या उद्वाडा येथे झोराष्ट्रीयन पंथियांची एक भव्य व सुंदर आगियारी आहे. विशेष म्हणजे या आगियारीतील अग्नी गेली सतत एक हजार वर्षे अखंडपणे जागृत आहे. त्यामुळेच झोराष्ट्रीयन लोक या आगियारीला आवर्जून भेट देतात. अनुताई वाघ यांनी स्थापन केलेले आदिवासींचे शैक्षणिक प्रकल्प याच परिसरात घोलवड येथे कार्यरत आहेत.
नजीकचे रेल्वे स्थानक : डहाणू ( प.रे.)
मुंबई-डहाणू अंतर १४५ कि.मी.


संदर्भ: www.shivsena.org
लेखक :anonymous
छायाचित्रे:www.tripadvisor.com

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search