मुंबईपासून अगदी नजीक असलेले हे समुद्रकिनारे अलिबागपासून अवघ्या १२ कि.मी. अंतरावर आहेत. प्रवासाच्या दृष्टीने अतिशय सहजासहजी जाता येण्यासारखे हे समुद्र किनारे स्वच्छ, सुंदर आणि नितळ आहेत. सागर किनाऱ्यालगत असलेलं मांडवा हे गाव सुद्धा नारळाच्या बागांमुळे खूपच सुंदर दिसतं. गावापासून जवळच किहीमचा बीच आहे. या बीचवर तंबू उभारून तुम्ही सुटीचा काळ निवांतपणे घालवू शकता. एम.टी.डी.सी.तर्फे या ठिकाणी तशी सोय केलेली आहे. सभोवताली रंगीबेरंगी रानफुलांनी व्यापलेलं हिरवं रान, नारळीच्या बागा, कधीही न दिसणारी वेगवेळ्या रंगांची फुलपाखरं आणि पक्षी यामुळे हे ठिकाण खूप प्रसन्न वाटतं. पक्षीमित्र डॉ. सलीम अली यांचं तर हे अतिशय प्रिय असलेले ठिकाण.
या सागरकिनाऱ्याला लागूनच कुलाबा किल्ला असून मुरुड व चौल ही ऐतिहासिक ठिकाणेही जवळच आहेत.
नजीकचे रेल्वे स्टेशन : पनवेल
पनवेल-किहीम अंतर (रस्त्याने) : ८५ कि.मी.
मुंबई-किहीम अंतर (रस्त्याने) : १३६ कि.मी.
संदर्भ: www.shivsena.org
लेखक :anonymous
छायाचित्रे:http://tourmet.com
छायाचित्रे:http://tourmet.com