लागणारे साहित्य:
३०० ग्राम पनीर,३ लवंगा, २ ते ३ मिरी दाणे, एक लहान दालीचीनीचा तुकडा नसेल तर दालचिनीची पावडर हि वापरू शकता,एक मध्यम कांदा बारीक चिरून घ्यावा, एक चमचा आलं पेस्ट,एक चमचा लसूण पेस्ट,एक कप टॉमेटो प्युरी,५ ते ६ कप काजूची पेस्ट, अर्धा कप दही आणि एक चमचा गरम मसाला, १ चमचा आलेलसूण पेस्ट, अर्धा चमचा चाट मसाला,दिड चमचा लाल तिखट, २ चमचा चिरलेली पुदिना पाने,
२ चमचा मलई,४ ते ५ चमचा तेल,चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर
कसे तयार कराल:
कढईत तेल गरम करावे. त्यात अख्खे मसाले परतावे. त्यावर चिरलेला कांदा घालून परतावा. कांदा परतला की आलेलसूण पेस्ट परतावी.
टॉमेटो प्युरी घालून त्याचा कच्चा वास जाईस्तोवर मंद आचेवर शिजू द्यावे . काजू पेस्ट घालून ५ ते ६ मिनिटे उकळवावे. अधून मधून तळापासून ढवळत राहावे आणि नंतर पनीर घालावे.आता दह्याचे मिश्रण आणि मीठ घालावे. मंद आचेवर ४ ते ५ मिनिटे शिजवावे. नंतर पुदिना पाने, मलई आणि साखर घालावी. झाकण ठेवून १० ते १२ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे.
गरम चपाती किंवा रोटी सोबत सर्व करावे.
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous