१०/२७/२०१७

कोहळ्याच्या वड्यासाहित्य


·       अर्धा किलो कोहळ्याचा कीस
·       २ नारळ
·       ३ वाट्या साखर
·       १ वाटी पिठी साखर
·       एक चमचा तूप
·       १ वाटी साय किंवा खवा
पाककृती


·       कोहळ्याचा किस वाफवून घ्यावा.
·       नारळ खोवून मिक्सरमध्ये बारीक वाटावा.
·       एका जाड बुडाच्या भांड्याला तूपाचा हात फिरवावा.
·       त्यात नारळ, कीस, साधी साखर व साय / कुस्करलेला खवा घालावा.
·       गॅसवर ठेवून मंद आंचेवर ढवळत राहावे.
·       मिश्रण घट्ट होऊन कडेने सुटायला लागले की पिठी साखर घालून एकदोन मिनिटे  ढवळावे.
·       खाली उतरवून मिश्रण कोमट होईपर्यंत घोटावे.
·       तूपाचा हात लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण ओतून थापावे.
·       गार झाल्यावर वड्या कापाव्यात.
पाककृतीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे
पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे
एकूण वेळ : ३५ मिनिटे
पदार्थाचा प्रकार : गोड पदार्थ
किती व्यक्तींसाठी : सुमारे ५० ते ६० वड्या 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search