१०/२५/२०१७

गूळ-पापडीच्या वड्यासाहित्य

·       दोन वाट्या गव्हाचे पीठ
·       एक वाटी जाड पोहे
·       एक वाटी साजूक तूप
·       एक वाटी गूळ (किसलेला)
·       वेलदोडे आणि जायफळ यांची पूड प्रत्येकी १ चमचा
·       काजू व बदाम यांचे काप
पाककृती

·       गॅसवर एका कढईत साजूक तूप गरम करून त्या गरम तुपात जाडे पोहे तळून घ्यावेत.
·       गार झाल्यावर मिक्सरमधून फिरवून पूड करून घ्यावी.
·       त्याच कढईत थोडेसे साजूक तूप गरम करावे.
·       गरम झाल्यावर त्यात कणिक घालावी.
·       कणकेचा रंग तांबूस होईपर्यंत खमंग भाजून घ्यावी. खमंग वास सुटला पाहिजे.
·       त्याच्यात जाड पोह्यांची पूड घालून चांगले मिक्स करावे.
·       या मिश्रणात किसलेला गूळ घालून तो पातळ होईपर्यंत हलवत राहावे.
·       मग त्यात वेलदोडे आणि जायफळ यांची पूड टाकूनचांगले हलवून मिक्स करावे.
·       एका पसरट ताटाला तूप लावावे आणि त्यात हे मिश्रण ओतावे.
·       वाटीच्या बूडाला तूप लावून ते मिश्रण वाटीच्या साह्याने ताटभर पसरावे.
·       गरम असतानाच वड्या पाडाव्यात.
·       काजू बदामाचे काप पसरून सजवावे.
·       थंड झाल्यावर वड्या काढाव्यात.
पाककृतीसाठी लागणारा वेळ : ४० मिनिटे
पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे
एकूण वेळ : ५५ मिनिटे
पदार्थाचा प्रकार : गोड पदार्थ
किती व्यक्तींसाठी : २ व्यक्तींसाठी 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search