साहित्य
·
कोफ्त्यासाठी
·
किसलेलं कच्च केळं – १
·
उकडलेला बटाटा – १
·
कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची पेस्ट – १ चमचा (पाणी न घालता वाटणे)
·
जिऱ्याची पूड अर्धा चमचा
·
राजगिरा / साबुदाणा पीठ – प्रत्येकी १ मोठा चमचा किंवा उपासाची
भाजणी २ मोठे चमचे
·
चवीनुसार मीठ
·
ताक किंवा पाणी – गरजेप्रमाणे
पीठ मळण्यासाठी
·
तळण्यासाठी तेल किंवा तूप
·
ग्रेव्हीसाठी
·
दाण्याचं कूट – २ मोठे
चमचे
·
ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची पेस्ट – १/२ छोटी वाटी (मऊसर वाटून घेणे)
·
तूप, जिरे – फोडणी साठी
·
चवीनुसार मीठ / साखर
पाककृती
·
प्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये कोफ्त्यासाठी दिलेले सर्व साहित्य
एकत्र करावे. गरजेप्रमाणे ताक किंवा पाणी घालून गोळा मळावा. शक्यतो ताक / पाणी
लागत नाही, कारण
केळ्याचा ओलसरपणा पुरतो.
·
तयार पीठाचे मध्यम आकाराचे गोळे करून मंद आचेवर तेलात किंवा तुपात
तळावेत. कमी तेलकट / तुपकट करण्यासाठी सानिका नि सांगितल्याप्रमाणे आप्पे पात्राचा
वापर करावा
·
आता ग्रेव्ही साठी एका कढईत तूप – जिऱ्याची फोडणी करावी
·
त्यात तयार केलेली पेस्ट (नंबर २ मधे दिलेली) टाकून जरा वेळ परतावे
·
मग दाण्याचं कूट टाकून पाणी घालावे. ग्रेव्ही कितपत घट्ट किंवा
पातळ हवी आहे, त्यानुसार
पाण्याचे प्रमाण ठरवावे
·
चवीनुसार मीठ / साखर घालून मंद आचेवर एक ५ मिनिटे ग्रेव्ही उकळू
द्यावी आणि गॅस बंद करावा.
·
बाउलमध्ये तयार कोफ्ते ठेवून वरून ग्रेव्ही घालावी
पाककृतीसाठी लागणारा वेळ : ३० मिनिटे
पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे
एकूण वेळ : ४५ मिनिटे