१०/२८/२०१७

इतिहास प्रचंडगडाचा


इ. स. १७०४ प्रचंडगडावर किल्लेदार सुलतानराव सिलींबकर यांना उत्तम कामगिरीबद्दल शंकराजी नारायण पंतसचिव यांनी पायदळाची पंचहजारी दिली. परंतु याचवेळी पातशहा औरंगजेब स्वतः राजगड - तोरणा जिंकण्याच्या उमेदीने कानद खोऱ्यात येऊन थडकला. या वेळी औरंगजेबाचे वय ८७ होते. तीन चार महिने प्रयत्न करून दोन्ही गडांना वेढे घालून औरंगजेबाने मराठ्यांनाही जेरीस आणले .
तोरण्याचे हवालदार हरी बापूजी हे शर्थीने झुंजत होते. पायथ्याशी धनाजी जाधवांकडे औरंगजेबाने अखेर तहाची बोलणी सुरु केली. पण ती फिस्कटल्यावर सुलतान हुसेन, हिमिदोद्दिनखान, तर्बियतखान, मुहम्मद आमीरखान, अमानुलाहखान, अताहुल्लाहखान यांनी तोरण्यावर निकराने हल्ला चढविला. रसद नेणारी मराठ्यांची माणसे त्यांनी पकडली. मावळ्यांपैकी काहींना फितवले आणि रात्री चंद्र उगविण्यापूर्वी तोफांचे गोळे उडून उधळलेल्या धुळीचा फायदा घेऊन तटाला दोराची माळ लावून गडावर प्रवेश केला. शिंग फुकून हल्ला चढविला. गडावर मराठी सैन्य अपुरे होते. शे-पन्नास गडकरी ठार झाले. हवालदार व हरी बापूजी यांची मुंडकी उडवली गेली. औरंगजेबाने आनंदाने तोरण्याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. या विजयाबद्दल अनेकांना पारितोषिके मिळाली.


संदर्भ: https://www.facebook.com/Amhichtevede?fref=nf
लेखक :anonymous


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search