१०/०७/२०१७

कोळंबी मसाला


लागणारे साहित्य:

दीड वाटी कोळंबी, चार लहान कांदे, दोन  टोमॅटो,  दोन  चमचे आले, लसूण, कोथिंबीर व मिरची पेस्ट, अर्धा चमचा हळद, एक  चमचा गरम मसाला पावडर, एक  चमचा मिरची पूड, हिंग, चार चमचे साय, अर्धी वाटी तेल, मीठ.

कसे तयार कराल:

आधी कोळंबी साफ करून तिला मीठ व हळद लावून ठेवावी. आता कांदा-टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.त्यानंतर तेलावर हिंगाची फोडणी करून त्यात हळद, मिरचीपूड, गरम मसाला टाकावा व दोन मिनिटे शिजूनघ्यावा व  त्यात कांदा घालून लाल होईपर्यंत शिजवावा. तेल सुटू लागले की चिरलेले टोमॅटो व कोळंबी घालून नीट परतावे व गरजेनुसार मीठ घालून शिजू द्यावे.आणि कोलंबी मसाला तयार. सर्व करताना वरती कोथिंबीर बारीक कापून पसरावी आणि सर्व करावे. 

संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवार

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search