लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी। जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी। एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…!!!!

Facebook

!-- BEGINNING OF CODE -->



लागणारे साहित्य: 

एक  वाटी मटकी,एक  बटाटा,तळण्यासाठी तेल,एक कांदा,एक  टोमॅटो,गरम मसाला,फरसाण,पोहे कुरमुर्याचा चिवडा,कोथिंबीर बारीक चिरून,लिंबू,ब्रेड किंवा पाव,कट बनवण्यासाठी साहित्य तीन ते चार लसूण पाकळ्या,एक आले,दोन चार मिरी,जराशी दालचिनी,दोन टे तीन  लवंगा,एक  तमालपत्र,एक  चमचा जिरेपूड,एक चमचा धनेपूड,अर्धी वाटी खवलेला ओला नारळ,एक  कांदा,दोन  टोमॅटो,चार टे पाच लहान चमचे लाल तिखट,फोडणीसाठी तेल,आमसुल किंवा चिंच,मीठ

कसे तयार कराल

आधी  मटकी बारा तास  पाण्यात भिजत घालावे आणि  सुती कपड्यात बांधून मोड येयीपर्यंत ठेवावे.मटकीला मोड आले कि कट बनवून घ्यावा. त्याचवेळी मटकी कूकरमध्ये दोन शिट्ट्या करून शिजवून घ्यावी.कट बनवण्यासाठी लसूण पाकळ्या, आले, मिर्या, दालचिनी, लवंगा, तमालपत्र, जिरेपूड,धनेपूड मिक्सरवर  बारीक बारीक करून घ्यावे.आता कढईत चार ते पाच चमचे तेल गरम करावे. त्यात मिक्सरमधून काढलेला मसाला घालून परतावा. मसाल्याचा छान गंध सुटला कि त्यात एक कांद्याच्या आणि दोन टोमॅटोच्या मोठ्या फोडी घालून परतत रहावे. सर्वात शेवटी खवलेला नारळ घालून परतावा. मिश्रणाला तेल सुटले आणि कांदा शिजला कि गॅस बंद करून बाजूला काढून थंड करावे. मिश्रण थंड झाले कि त्यात एक भांडे पाणी घालून मिक्सरवर पातळ पेस्ट करून घ्यावी त्या नंतर मटकीची उसळ बनवून घ्यावी. पातेल्यात दोन ते तीन चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद घालून शिजवलेली मटकी घालावी. थोडे पाणी घालावे, दोन चमचा गरम मसाला घालावा. बारीक गॅसवर उसळ उकळत असताना दुसर्या गॅसवर लहान कढईत अगदी थोडे बटाट्याचे तुकडे तळण्यापुरते तेल गरम करावे.एक बटाटा सोलून त्याचे लहान चौकोनी तुकडे करावे, आणि मध्यम गैस वर बटाटे व्यवस्थित तळून घ्यावे, तळलेले बटाट्याचे तुकडे उसळीत टाकावेत. चवीपुरते मिठ घालावे आता लहान कढई खालचा गॅस बारीक करून उरलेल्या तेलात हळद, हिंग, चार ते पाच चमचे लाल तिखट घालून तयार केलेली मसाल्याची पातळ पेस्ट घालावी. मीठ घालावे. आंबटपणासाठी आमसुल किंवा थोडा चिंचेचा कोळ घालावा. आवश्यकतेनुसार पाणी घालून एक उकळी काढावी.उसळ आणि कट तयार झाला कि कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.नंतर डिशमध्ये उसळ घालावी. त्यावर एक पळी कट घालावा. त्यावर चिवडा, फरसाण, कांदा, टोमॅटो घालावे. लिंबू पिळून तयार मिसळ ब्रेडबरोबर किंवा पावा बरोबर सर्व करावी.

संदर्भ: facebook share
लेखीका : anonymous


वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita