Recent Posts

सये आठवण तुझी येती मनी...

१०/२७/२०१७


सये आठवण तुझी येती मनी,
वाहत वाहत रुपेरी वा-यासंगी...
अन् हळूच स्‍पर्श करुनी जाई,
गंध वेडा तुझा माझ्या अंगी...

नकळत पुन्‍हा का ओठावरती,
नाव फक्‍त तुझेच रेंगाळती...
जणू पर्णावर सजलेला दवबिंदू,
मोती सारखी शोभून दिसती...

रोज स्‍वप्‍नात मज येती तू,
करी घायाळ मज ह्दयास...
उडवूनी झोप मृग नयनाची,
वेड लाविले होते मनास...

कळले ना मज अजून ते,
घडले सारे कधी कसे...
जुळले बंध दोन मनीचे,
मग का एकटे पडले असे...

तुज आठवणीच्‍या हिंदोळ्यावर,
आता मन ही वेडी झुलती...
मनी साठलेल्‍या लुप्‍त भावना,
मग सांगायास तुज का अडखळती....


संदर्भ: facebook share
लेखक :स्‍वप्‍नील चटगे