सख्या रे तुझी साथ रे हवी,
एकटी भरकटते मी वाटेवरी..
भेटशील ना रे मज तू सांगना,
झाली मी बावरी वेडी तुझ्यापरी...
गहि-या क्षणी वाटते मनी,
नवे रेशमी स्वप्न उमलावे...
रेशमी खुशीत सख्या रे तुझ्या,
आज धुंद होवून मी हरवावे..
भेटशील ना रे मज तू सांगना,
झाली मी बावरी वेडी तुझ्यापरी...
गुलाबी ओठावरी शब्द ही नवी,
मनी झंकारते प्रेमळ गाणी...
स्वप्त सुरांच्या वाटेवरती साद ऐकू येई,
नवे सूर गुंजते माझ्या मनी...
भेटशील ना रे मज तू सांगना,
झाली मी बावरी वेडी तुझ्यापरी...
नयनात रंगलेले स्वप्न रे तुझे,
स्वप्नात गुंतलेले अधिर मन माझे...
रोज भेटते मी तुज स्वप्न नगरी,
की वेडे भास होतात रे मला तुझे...
संदर्भ: facebook share
लेखक :स्वप्नील चटगे