१०/२६/२०१७

वसईचा समुद्रकिनारा


मुंबईनजीक ठाणे जिल्ह्यातील वसई येथील समुद्र किनाराही अतिशय सुंदर आहे. वसई हे पश्चिम सागरकिनाऱ्यावरील गाव सतराव्या शतकाच्या प्रारंभ नौका बांधणीसाठी अतिशय प्रसिद्ध होतं. या गावाचे महत्त्व ओळखूनच पोर्तुगीजांनी आपली वसाहत या ठिकाणी सुरू केली होती. या वसाहतीच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी वसईचा किल्ला बांधला होता. पुढे १७३९ मध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पाडाव करून हा किल्ला ताब्यात घेतला. या विजयाचे शिल्पकार होते चिमाजी आप्पा.
पश्चिम रेल्वेवरील वसई स्थानकापासून वसई हे गाव व किल्ला सुमारे ५-६ कि.मी. अंतरावर असून या परिसरात पोर्तुगीज काळातील वास्तूंचे भग्नावशेष आजही पाहायला मिळतात. वसईपासून पुढे सुमारे १० कि.मी. अंतरावर असलेले नालासोपारा हे गाव पूर्वी ख्रिस्तपूर्व काळात व नंतरही खूप प्रसिद्ध होते. या गावास एकेकाळी कोकणच्या राजधानीचा दर्जा प्राप्त झाला होता. या काळात उभारण्यात आलेल्या बुद्धकालीन वास्तू व वस्तूंचे अवशेष येथील उत्खननात अजूनही सापडतात. गौतम बुद्धांचा पूर्वजन्म याच गावात झाला होता अशी आख्यायिका आहे.
नजीकचे रेल्वे स्थानक : वसई (प.रे.)
मुंबई-वसई : ५२ कि.मी.

संदर्भ: Shivsena.org
लेखक :anonymous
छायाचित्रे:Internet 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search