११/०३/२०१७

श्री महागणपती मंदिर रांजणगाव- अष्टविनायक

महाराष्ट्रात असलेल्या अष्टविनायकांपैकी चौथा गणपती रांजणगावात आहे. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.

या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की :- त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारीवदे महागणपती’ असेही म्हटले जाते.
अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. हा महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे.

हे महागणपतीचे स्थान इसवी सनाच्या १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.हे देवस्थानही पुणे जिल्ह्यातच असून पुणे-नगर रस्त्यावर आहे. येथील गणपती ’श्रीमहागणपती’ या नावाने प्रसिद्ध आहे. मंदिरात असलेली मूर्ती ही दर्शनी मूर्ती. मूळ मूर्ती मात्र तळघरात दडलेली आहे असा समज असून ती २० हात व १० सोंडी असलेली असावी असा तर्क आहे.
मंदिर पूर्वाभिमुख असून त्यास इंदूरचे सरदार किबे यांनी सभामंडप बांधलेला आहे. गाभारा श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधलेला असून शिंदे, होळकर आदी सरदारांनीही बांधकाम तसेच इनामाच्या स्वरूपात मोठे सहाय्य दिले आहे. पुणे शहरापासून रांजणगाव येथे जाण्यासाठी एस.टी. बसेस उपलब्ध आहेत.
नजीकचे रेल्वे स्टेशन : पुणे व उरळी
पुणे-रांजणगाव अंतर ५० कि.मी. , उरळी-रांजणगाव अंतर १६ कि.मी.

संदर्भ: mr.wikipedia.org, www.shivsena.org
लेखक :anonymous
छायाचित्रे:www.tripadvisor.com 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search