छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिनेअगोदर सुरु झाली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपर्‍यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. सुमारे ११००० ब्राह्मण यातील काही आपल्या कुटुंबीयांबरोबर आले होते. (एकंदर आकडा ५००००). इतर लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिने त्यांना मिष्ठान्नाबरोबर त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. ब्राह्मण सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती. दुसर्‍या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एक धार्मिक विधी आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले होते. राजे शिवाजी यांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला. त्यांचे आशीर्वाद घेतले.
त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरात जाऊन देवर्शन केले. चिपळूणला परशुराम यांचे दर्शन घेतले पूजा केली आणि ते रायगडाला १२ मे १६७४ला परत आले. पुन्हा चार दिवसांनी ते प्रतापगडावरील प्रतिष्ठापणा केलेल्या भवानीमाता यांच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते. २१ मेला पुन्हा रागयगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी २८ मे ला प्रायश्चित्त केले जानवे परिधान केले. दुसर्‍या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. (त्यावेळीही). यावेळी गागाभट्टाला ७००० होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळुन १७००० होन दक्षिणादिली.
दुसर्‍या दिवशी सोनेचांदीतांबेजस्तकथीलशिसं आणि लोखंड अशा सात धातूंची वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्रकापूरमीठखिळेमसालेलोणीसाखरफळे इत्यादींच्या तुला झाल्या. हे सर्व आणि शिवाय लाखभर होन ब्राह्मणांना देण्यात आले. ६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, प्रमुख ब्राह्मणांच्या पायी पडून, राज्याभिषेक सुरु झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्र भेट देण्यात आले. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेक याचा अर्थ राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडी बांधलेली सोयराबाईदुसर्‍या मंचावर तर बालसंभाजी थोडासा मागे बसलेला होता. अष्टप्रधानातील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजीने लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली. बरोबर मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.
राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. भव्य सिंहासन सभासदबखर म्हणते त्या प्रमाणे) ३२ मण सोन्याचे [१४ लाख रुपये मूल्य असलेले] सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेला होता. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्ण्यांनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. राजाला आशीर्वाद दिला. राजेंनी त्यांना भेटवस्तू दिल्या. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. प्रत्येग गडावर ठरल्याप्रमाणे तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभटांनी पुढे येऊन त्यांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून आशीर्वाद दिला. इतर ब्राह्मण मंडळी पुढे झाली आणि त्यांनीही त्यांना आशीर्वाद दिले. राजे शिवाजी महाराजांनी ब्राह्मण आणि इतर सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. सोळा प्रकारचे महादान त्यांनी केले. त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन त्यांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पद, नियुक्तीपत्रे, धन,घोडे,हत्ती,रत्न,वस्त्र,शस्त्र प्रदान केले. हे सर्व सकाळी आठ पर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे शिवाजी महाराज गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तीवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सेनेचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुरे, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिराचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita