बाप माझा झोपला
कर्जाचा डोंगर फेडून
बाप माझा थकला
घामाच पाणी करून
डोंगरास पाजत सुटला
उपास मारीन बापाच्या
गोळा पोटात उठला
दारिद्र्याच्या पाहून रेषा
अश्रू ढाळत सुटला
डोईवरती घेऊन कर्ज
सेवेत काळ्याआईच्या रमला
मेघराजन मांडला खेळ
डाव सारा भंगला
बाप अडाणी माझा
आशेवर सरकारच्या बसला
विश्वासाचा करून घात
सरकार मात्र हसला
फाटक्या तुटक्या नशिबाला
बाप माझा थकला
मरणाला कवटाळून
बाप माझा झोपला
कवी
किरण दिलीपकुमार म्हसकर ©
मु . केळी पो . चावंड ता जुन्नर जि पुणे ४१०५०२
मो . नं . ९०११११०५६