११/१६/२०१७

अडॉल्फ हिटलर


इतिहास हा इतिहास असला तरी आपले भविष्य तोच घडवित असतो, असे आपले म्हणने काही चूक नाही, आणि इतिहासात वेडे होण्याचीही एक मर्यादा असते हे "भाउंचे" सांगणे आपण विसरुही शकत नाही., इतिहास माणसाला घडवतो तसा इतिहास माणसाला बिघडवतो देखील..!
अडॉल्फ हिटलर, नाव ऐकलं की गाव हालतय ह्या म्हणीचा परीघ हिटलर बाबतीत बदलून जग करावा लागेल. पण 8 - 9 वर्षांपूर्वीचा हिटलर आणि जग ज्या हिटलरला ओळखते त्यात जमीन आसमानचा फरक होता. 1936चं जागतिक शांततेसाठीचं नोबेल पारितोषिक कोणाला द्यावं यात जी काही दोन चार नाव सुचविण्यात आली होती त्यात हिटलरचं देखील नाव होतं. वेगवेगळ्या घटनांमधून माणूस घडत जातो, कुठल्याही एखादया परिस्थितीला आपण जवाबदार धरु शकत नाही.

विद्यार्थी दशेत असताना इतिहासासाठी लाभलेले शिक्षक डॉ. लियोपोल्ड यांची इतिहास शिकवन्याची तळमळ आणि वेगळेपण ही गोष्टही हिटलरच्या चरित्राची पाने बदलण्यास कारणीभूत झाली असे म्हणावे लागेल.
हिटलर म्हणतो की "ऐतिहासिक दृष्टीनं विचार करण्याच्या या पद्धतीचा परिणाम असा झाला की चालू घड़ामोडींचा म्हणजे राजकरणाचा अन्वयार्थ लावण्यासाठी इतिहास ही मला अक्षय अशी खाण वाटू लागली. मी राजकारण शिकलो नाही. राजकारणान मला बरच शिकवलं"
इतिहासाच्या शिक्षणाने त्याच्यावर पुढील परिणाम झाले असं तो नमूद करतो.
1. मला इतिहास या विषयाची आवड़ निर्माण झाली.
2. मी त्याचवेळी मनाने बंडखोर झालो
3. जर्मनीच्या संरक्षणासाठी ऑस्ट्रियन साम्राज्याचा नाश होण आवश्यक आहे, अशी माझी धारणा झाली.
4. राजघरण्याविषयी अभिमान आणि राष्ट्रीय अभिमान या संकल्पना एक नाहीत याची जाण आली.
5. हॅब्सबर्गची सत्ता जर्मन राष्ट्राला दुर्दैवाच्या खाईत लोटल्याशिवाय राहणार नाही हा विचार मनात दृढ़मूल झाला.
इतिहासातून घडलेल्या माणसाची ही एक आगळीवेगळी झलक
© आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची
https://www.facebook.com/Amhichtevede/posts/1899792626703113

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search