११/०९/२०१७

इंटरनेटचे जाळे

इंटरनेटच्या जगात हरवून बसलो स्वत:ला 

वेळ काळचे भान नसे ,तत्पर असते सेवेला 
केव्हा ,कुठेही ते उपलब्ध असते 
आपली कितीतरी महत्त्वाची कामे तेच तर करतेI 
किती क्षेत्रांची माहिती त्यावर 
भाषा समृद्ध होते त्यावरच 
हिंदी , मराठी,इंग्रजीची रेलचेल असे 
असे हे इंटरनेटचे जाळे जवळच असेI 
देश,विदेशातील व्यवहारही तत्पर होत असते 
दूरदेशी आपली व्यक्ती दिसे स्काइपवर ,
ती घरात येता आई तू चिंता ना कर 
केव्हा ,कुठेही ,कसेही त्याचा उपयोगच फार 
फक्त आहारी जाऊ नका इंटरनेटच्या 
आहार -विहार मात्र नीट सांभाळा 
योग्य वापर ,योग्य वेळी 
योग्य योग ,व्यायाम ,शिस्त ,संयमहि योग्य वेळी I 
ठरवायची दिनचर्या आपणच आपली 
योग्य सर्व पुढे भविष्यात कामी येईल ,
योग्य विचार आताच करा ,
इंटरनेटचा वापर योग्य ठिकाणीच योग्य वेळी करा I 
अनघा कुलकर्णी (९९६७३६०६५७)

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search