११/०३/२०१७

उपासाची पुरी-भाजीसाहित्य

·       चार मोठे बटाटे
·       दोन वाट्या राजगिर्‍याचे पीठ
·       दोन वाट्या साजूक तूप
·       एक चमचा जिरे
·       चवीनुसार ३-४ हिरव्या मिरच्या
·       चवीनुसार मीठ
·       चिमूटभर साखर
·       एक चमचा किसलेले आले
·       अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
·       ५-६ कढीपत्त्याची पाने
·       अर्धी वाटी खोवलेला ओल्या नारळाचा चव.
पाककृती

·       भाजी
·       बटाटे उकडून घ्या. त्यांच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्या.
·       गॅसवर एका कढईत साजूक तूप गरम करून घ्या व त्यात जिरे टाका.
·       जिरे चांगले तडतडले की मग हिरव्या मिरच्यांचे बारीक चिरलेले तुकडे, ५-६ कढीपत्त्याची पाने आणि किसलेले आले घालून पुन्हा दोन मिनिटे चांगले परतून घ्या.
·       नंतर बटाट्याच्या बारीक चिरलेल्या फोडी व चवीनुसार मीठ व चिमूटभर साखर घालून झार्‍याने भाजी खाली-वर हलवून मिक्स करा.
·       नंतर कढईवर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या. झाकण काढून भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा झाकण ठेवा.
·       पुर्‍या
·       एका परातीत राजगिर्‍याचे पीठ घ्या.
·       त्यात चिमूटभर मीठ व दोन चमचे साजूक तुपाचे मोहन घालून नेहमीच्या पुर्‍यांसाठी भिजवतो त्याप्रमाणे घट्ट पीठ भिजवा व १० मिनिटे पातळ सूती कपड्याने झाकून ठेवा.
·       दहा मिनिटांनी कापड काढून पीठ पुन्हा एकदा चांगले मळून घ्या व नेहमीसारख्या पुर्‍या लाटून साजूक तुपात टाळून काढा.
पाककृतीसाठी लागणारा वेळ : ३० मिनिटे
पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे
एकूण वेळ : ४५ मिनिटे

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search