हे एक मराठ्यांच सर्वात आवडीच हत्यार,याची भेदकता तलवारीहुन जहाल,उभ्या हिंदुस्थानात या शस्त्रावर मराठ्यांइतके नियंत्रण कोणाचेच नाही,मुघल राजपुत लोकांमध्येही हे हत्यार असायचे,पण मराठे यात जास्त कुशल अन तरबेज होते,पट्टा फ़िरवणे मोठे कौशल्याचे काम आहे ,खुप कसब आणि अभ्यास असलेला माणुस पटटा व्यवस्थित फ़िरवु शकतो,पुर्वीचे मावळे १६ हात लांब पट्टाही वापरत,याला बेल्ट प्रमाणे कंबरेभोवती गुंडाळले जाई,सय्यद बंडा ला जिवा महालाने १६ हात लांबुन कलम केले होते.छोट्याश्या लिंबाचे दोन तुकडे पट्ट्याने होतात. आपण मराठीत पटाइत हा शब्द वापरतो,म्हणजे तरबेज,मुळात पट्टे चालवण्यात वाकबगार असलेल्या लोकांना पटाईत असे म्हणले जाते,तोच शब्द पुढे आपल्या बोली भाषेत रुढ झाला,मराठी हशमांमध्ये एक म्हण होती "धारकरी " म्हणजे जे व्यक्ती तलवार , भाला तीर कमान अथवा अजुन काही अशा ४-५ हत्यारांमध्ये तरबेज असली की त्यांना "धारकरी" गणले जायचे.),अन अजुन एक म्हण होती की "दहा धारकरी तर एक पट्टेकरी " यावरुनच पटाईताला काय मान असेल हे लक्षात येते पट्ट्याची लांबी ५ फ़ुट असते,त्याचे पाते ४ फ़ुट असुन त्याची मुठ म्हणजे खोबळा साधारण १ फ़ुटाचा असतो,याचे पाते लवचिक असते,पण लवचिक असले तरी याच्या कौशल्याने केलेल्या वाराने उभा माणुस चिरला जावु शकतो,गर्दन देखिल कटू शकते पट्टा चालवणारा जणु काही आपल्या भोवती १० फ़ुटांचा पोलादी घेर उभा करतो,यात प्रवेशल्यावर साक्षात म्रुत्युच दोन्ही हातात पट्टा,घेणारा पटाईत हा अतिकुशल समजला जातो,याचे कौशल्य अन प्रहार क्षमता साहजिकच दुपट असते याची काही वैशिष्ट्ये आहेत,म्हणजे याचे पाते जरी लवचिक असले तरी पण याची वार करण्याची तलवारीपेक्षा क्षमता जास्त का,मुख्य कारण आहे आपण तलवार फ़िरवताना सगळा जोर आपल्या मनगटातुन लावत असतो,पण प्रत्यक्षात पट्टा फ़िरवताना आपला पुर्ण हात आपला दंड,खांदे आणि विंग्ज्चा भाग या सर्व अवयवांतुन ताकद लागलेली असते,पाते लवचिक असले तरी,जर वार करताना पाते लपकले नाही,अन वार सरळ झाला तर सरळ एक घाव दोन तुकडे होतात ..

https://www.facebook.com/ShivajiRaje.co.in/photos/a.403658243129522.1073741826.403654463129900/817597698402239/?type=3&theater

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita