बाळासाहेब,..ज्या कॉग्रेसवर तुमचा राग
होता..ती किती कमकुवत झालीये..हे
पाहण्यासाठी आज तुम्ही असायलं हवं होतं..
बाळासाहेब, ज्या गांधी घराण्यावर तुम्ही सतत
टीका केली ,त्यातील राहुल गांधीचं नेतृत्व
पाहण्यासाठी तुम्ही असायलं हवं
होतं..तुम्ही त्यांच्या भाषणावर व्यंगचित्र
काढली असती, सामनामधून भन्नाट
टिप्पणी केली असती!
शिवाजी पार्कात तुम्ही आणि अटल
बिहारी वाजपेयी एकत्र भाषण केली आहेत..आज
तुम्ही असता तर नरेंद्र मोदी आणि तुम्ही भाषणं
करून महाराष्ट्र दणाणून सोडला असता...'सामना'
मधून बातमी असती... दोन तोफा धडाडल्या!!
कॉग्रेसमुक्त महाराष्ट्र नाही तर कॉग्रेसमुक्त भारतं
हे तुमचं स्वप्न यावेळी कदाचित पूर्ण होईल..पण ते
पाहायला तुम्ही नाही...
पण तुम्ही नाही हे बरचं आहे....तुमच्या वारसदारांचे
अहंकार आज महाराष्ट्रापेक्षा मोठे झाले
आहेत....एकाने फोन केला नाही, म्हणून दुसऱ्याने पण
टाळी दिली नाही..
मराठी माणसासाठी काय काय करू सांगणारे तुमचे
वारसदार वांद्रा ते दादर इतकं छोटं अंतर पार करू
शकतं नाही...कॉग्रेस-राष्ट्रवादीशी काय लढणारं??
बाळासाहेब हे पाहायला तुम्ही नाही, हेचं बरं!!
संतप्त,
एक मराठी मतदार..