औरंगजेबाने जेव्हा धर्मांधपणा सुरु केला आणि बिगर मुसलमान लोकांवर ( मुस्लिमेतरांकडून ) म्हणजे वैदिक, हिंदू , राजपूत, इंग्रज इत्यादी लोकांकडून "जिझिया कर " लादण्यात आला. हि गोष्ट राजांना समजली तेव्हा शिवरायांनी औरंगजेबाला एक पत्र लिहिले आणि याबद्दल खडे बोल सुनावले. ३ एप्रिल १६७९ रोजी लिहिलेले हे खालील पत्र आहे.
" सांप्रत अमुच्या संगे युद्धप्रसंगानंतर आपले संपत्ती खर्च झाले असता पादशहा-खजिना रिकामा जाहला, याकरिता हिंदू लोकांकडून जाजिया पट्टीचे द्रव्य उत्पन्न करून पादशाही गरजा त्याच्याआधारे पूर्ण करीत आहां असे ऐकण्यास आले. हि पादशाही निर्माण करणारा ( जलालुद्दीन) अकबर बादशहांनी न्यायाने ५२ वर्षे राज्य केले. त्यांनी ख्रिस्चन, ज्यू, मुस्लिम, दोउद पंथीय, काफर ( ansari), नास्तिक ( दहारिया ), ब्राह्मण ( वैदिक) आणि जैन धर्मगुरू या सर्व धर्म पंथीयांना वैश्विक हितसंबंध जोपासणारे प्रशंसनीय असे धोरण अवलंबले होते. त्यांच्या या अशा सहीष्णू हृदयाचे ध्येय एकच होते ते म्हणजे सर्व लोकांना आनंदी ठेऊन त्यांचे रक्षण करणे होय. त्यामुळेच त्यांची कीर्ती "जगत गुरु" या नावाने पसरली. "
"पुढे नूरउद्दीन जहागीर बादशाह यांनी २२ वर्षे पादशाही तक्त चालवले व चांगल्या कर्माने स्वर्गात पोहोचले. शाहजहान बादशाह यांनी ३२ वर्षे बादशाहत करून उपरात राहिले. आयुष्य चांगलेपनात घालून निरंतर कीर्ती मिळवली. यावरून कळते कि जो पुरुष जिवंत असताना लौकिक वान झाला त्याच्या मागे त्याची कीर्ती झाली आणि त्यास अचल लक्ष्मी प्राप्त जाहली"
" सदर लिहिलेल्या पादशहाचा प्रताप व पराक्रम असा त्यांनी दस्तूर व वहिवाटी केली. त्यांचे रक्षण करण्यास आलमगीर ( औरंगजेब) फिकीरबंद झाले. हे सर्व बद्शाहाही जाजीयापट्टी घेण्यास समर्थ होते. परंतु लहान थोर सार्वजन आपले धर्म जपतात व सर्व ईश्वराचे पाईक आहोत, असे जाणून कोणावरही जुलूम करावा हे मनात आणले नाही. त्यांची हि उपकाराची कीर्ती अजूनही आहे व हरएक लहानमोठ्याच्या तोंडी त्यांची स्तुती असून आशीर्वादही आहेत. जशी नियत तशी त्याची बरकत. लोकांचे कल्याण करण्यावरच या बादशाहांची दृष्टी होती. "
" हल्ली आपल्या कारकिर्दीत कित्येक किल्ले व मुलुख गेले व बाकी राहिलेले जात आहेत. कारण ते खराबी करण्याविषयी कमतर नाही. जे रयत लोक खराब आहेत. हर एक महालाचे उत्पन्न लाखास एक हजार येणे कठीण असे जाहले. बादशहा व बादशाहजादे यांच्या घरी दारिद्र्याचा वास जाहला. तेव्हा पदरचे मनसबदार व उमराव यांची अवस्था कळतच आहे. सारांश शिपाई लोक हैराण, सौदागर पुकारा करतात, मुसलमान रडतात, हिंदू लोक मनात जळतात आणि कित्येक लोकांस पोटास मिळत नाही असे आहे. तेव्हा राज्य चालविणे कसे ? त्यांच्यावर जिजीया पट्टीचा उपद्रव तो या प्रकारचा आहे. तो पूर्व-पश्चिमे पावेतो जाहीर जाहला आहे कि हिंदुस्तान चा पातशहा फकीर, ब्राह्मण, शेवडे, जोगी, संन्यासी, वैरागी व अनाथ, गरीब थकलेले, पडलेले असे एकंदर लोकांपासून जजीया घेतात व यातच पुरुषार्थ आहे असे समजतात. आणि तैमुर पातशाहाचे नाव बुडवितात असे जाहले आहे "
" अस्मानी किताब म्हणजे कुराण. ती ईश्वराची वाणी आहे. त्यात आज्ञा केली ती ईश्वर सर्व जगाचा किवा मुसलमानांचा आहे. वाईट अथवा चांगले असो दोन्हीही ईश्वराचे निर्मित आहेत. कोठे मश्जिद आहे त्याचे स्मरण करून बांग देतात. कोठे देवालय (मंदिर) आहे तेथे घंटा वाजवतात. त्यास कोणाचे धर्मास विरोध करणे म्हणजे आपल्या धर्मापासून सुटणे ( खर्या शिकावानुकीपासून दूर जाणे) व ईश्वराने लिहिलेले अमान्य करण्यासारखे आहे"
" न्याय मार्गाने पाहता जजीया पट्टीचा कायदा केवळ गैर पेशजी आहे . सुलतान अहमद गुजराथी हा असाच गैरचालीने वागला. त्यानंतर लो लवकरच बुडाला. त्यास त्या वृद्धापकाळी असे बद्ध होणे हे पराक्रमास अगदी योग्य नाही. याविषयी दृष्टांत जुलूम ज्यावर झाला त्याने खेद करून हायहाय म्हणून मुखाने धूर काढल्यास त्या धुराने तो जळून जाइल."
"तरीसुद्धा हिंदू लोकांस पिडा करण्यातच धर्म आहे असे आपल्या मनामध्ये आल्यास आधी राजा जयसिंग यांच्यापासून जजीया कर घ्यावा म्हणजे इकडूनही मिळण्यास कठीण नाही. उपरांत सेवेसी हजर आहे. परंतु जे गरीब, अनाथ व मुंग्या-चीलट्यांसारखे आहेत त्यास उपसर्ग करण्यात काहीच मोठेपणा नाही. पदरची मंडळीहि पाहता अग्नी तृणाने झाकतात, याचेही आश्चर्य वाटते. आपल्या राज्याचा सूर्य हा प्रतापचे उदयचलासारखे तेजस्वी असो . . ."
- चित्र . १. शिवाजी महाराज - ब्रिटिश म्युसियम मधील चित्र
२. औरंगजेब - व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युसिअम मधील चित्र
- संदर्भ - शिवकालीन पत्रासार संग्रह ( खंड ३ )
https://www.facebook.com/Amhichtevede/posts/1898705013478541

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita