११/१०/२०१७

तांदळाची खीर


साहित्य


·         १ वाटी चांगल्या प्रतीचा तांदूळ
·         ४ वाट्या दूध
·         १ वाटी (भरून) साखर
·         २ चमचे चारोळ्या व काजूचे काप
·         १ चमचा बेदाणा
पाककृती


·         तांदूळ धुवून चाळणीवर तासभर निथळत ठेवावेत. जरा ओलसर असतानाच पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये रवाळ वाटावेत.
·         साय न काढता दूध तापत ठेवावे. दूध उकळायला लागले की तांदळाचा रवा त्यात घालावा.
·         मध्यम आचेवर सतत ढवळत राहावे. साधारण अर्ध्या तासात रवा मऊसर शिजेल.
·         रवा शिजला आहे कि नाही हे बोटाने दाबून बघावे.
·         रवा शिजल्यानंतर साखर घालावी व ढवळत राहावे.
·         मिश्रण थोडे पातळसर होईल. ते दाटसर होईपर्यंत ढवळावे.
·         गॅस बंद करून त्यात वेलचीपूड घालावी.
·         गार झाल्यावर चारोळ्या, काजू, बेदाणे घालावेत.
·         फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खावी.
Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search