साहित्य
· १५ भेंडी, मध्यम आकाराच्या
· २ चमचे बेसन
· १ चमचे तांदूळ पीठ
· अर्धाचमचा आले लसूण पेस्ट
· १ चमचा लाल तिखट
· पाव चमचा हळद
· पाव चमचा जिरेपूड
· चवीपुरते मीठ
· तळण्यासाठी तेल
· चवीनुसार चाट मसाला
पाककृती
· भेंडी धुवून घ्यावी. व्यवस्थित पुसून देठं कापून घ्यावीत. प्रत्येक भेंडीचे एकदम पातळ उभे काप काढावेत.
· एका छोट्या वाटीत बेसन, तांदूळ पिठ, लाल तिखट, हळद, जिरेपूड, थोडा चाट मसाला आणि चवीपुरते मिठ एकत्र करून व्यवस्थित मिक्स करावे. भेंडीचे पातळ काप एका वाडग्यात घ्यावेत आणि त्यात आले लसूण पेस्ट घालून चमच्याने ढवळावे. त्यात बेसन पीठाचे मिश्रण घालून हलक्या हाताने मिक्स करावे. हे मिश्रण १५ मिनिटे झाकून ठेवावे.
· कढईत तेल गरम करावे. भेंडीचे मॅरीनेटेड पातळ काप तेलात सुटे करून सोडावेत. मिडीयम हाय गॅसवर कुरकूरीत होईस्तोवर तळावेत. शक्यतो ३ ते ४ बॅचमध्ये भेंडी तळावी. तळलेले भेंडी काप पेपर टॉवेलवर काढून घ्यावेत. यावर थोडे लिंबू पिळावे किंवा चाट मसाला घालावा. तिखटपणासाठी लाल तिखट भुरभुरावे.
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous