११/२१/२०१७

खमंग कचोरी


साहित्य

·       पाऊण वाटी उडीद डाळ तास भर आधी भिजत ठेवावी
·       १ चमचा बडिशेप
·       पाव चमचा हिंग पावडर
·       अर्धा चमचा गरम मसाला
·       ४ लवंगा, १ वेलदोडा
·       आठ मिरे
·       १ चमचा सुंठपुड
·       अर्धा चमचा पादेलोण
·       १ चमचा धणे
·       १ चमचा तिखट
·       ओवा, मीठ चवीनुसार
·       तेल २ चमचे
·       मैदा आणि रवा मिळून पाव किलो
पाककृती

·       एका प्लेट मध्ये रवा व मैदा, ओवा, मीठ, तेल घालून भिजवा.
·       भिजवलेली डाळ सर्व मसाले घालून वाटून घ्या.
·       थोड्या तेलावर हिंगाची फोडणी करून हे मिश्रण परतून घ्या.
·       मैद्याचे छोटे गोळे तयार करून घ्या.
·       मिश्रण पारीत भरून, लाटून गोल आकार द्या.
·       कढईत तेल गरम करावे आणि कुरकुरीत होईपर्यंत कचोरी लालसर होईपर्यंत तळावी.
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)


लेखीका : मनाली पवार 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search