Recent Posts

पापलेटची आमटी कोकणी पद्धतीची

११/०५/२०१७
साहित्य


·       दोन पापलेट
·       दहा ब्याडगी मिरच्या
·       पाच लसूण पाकळ्या
·       तीन-चार आमसूल
·       एक चमचा धने
·       छोटा कांदा
·       पाव चमचा हळद
·       खोबरे
·       मीठ
पाककृती


·       पापलेटचे तुकडे कापल्यावर त्याला धुवून मीठ व हळद लावा.
·       भिजवलेले धने व मिरची वाटून घ्या.
·       नंतर या वाटणात हळद, लसूण घालून पुन्हा मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
·       मग त्यात किसलेले बारीक खोबरे, उभा चिरलेला कांदा वाटून घ्या.
·       तेलात तयार केलेले वाटण परतवा. नंतर थोडे पाणी घालून उकळी येऊ द्या.
·       त्यात पापलेटचे तुकडे हळूवार सोडा. थोडे मीठ घालून ८-१० मिनिट शिजवा.
·       नंतर चिरलेली कोथिंबीर व आमसूल घातल्यास चव अधिकच वाढते.


संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवार