राजांनी बाजीप्रभूला लिहिलेल्या एका पत्रात हिरडस मावळातील कासोळगडाचा उल्लेख येतो. ह्या पत्रात राजांनी बाजीप्रभूला ह्या ओस पडलेल्या गडाचा ताबा घेऊन त्याला मोहनगड असे नाव दिले आहे. पिलाजी भोसलेने बहुदा हे पत्र नेले होते कारण त्याला २५ लोकांनिशी ह्या गडावर नेमले होते. बाजीप्रभूना गडाची व्यवस्था लावायला सांगितले होते व ते केल्यावर गडाचा ताबा पिलाजीला द्यायचा होता.
मोहनगड किंवा कासोळगड हिरडस मावळात असल्याचे ह्यात म्हटले असले तरी तसा कुठला किल्ला अजून सापडला नाहीये. त्यावरच्या शिबंदीची संख्याही २५ इतकी कमी असल्यामुळे तो फारसा मोठा नसावा असे वाटते.
ह्या पत्राचा दिनांक १ रमजान शुहूर सन तिसा खमसैन अलफ म्हणजे मुसलमानी वर्ष १०५९ मधला आहे. ह्या वर्षात रमजान चा पहिला दिवस दोन वेळा आला होता - एकदा सुरवातीला व दुसऱ्यांदी शेवटी. पण पत्रातून हे कळत नाही की त्यापैकी कोणता दिवस अपेक्षित आहे. त्यामुळे ख्रिस्ती गणनेप्रमाणे ह्याचा दिनांक काढला तर तो २४ मे १६५८ किंवा १३ मे १६५९ ह्यापैकी एक धरावा लागेल.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ८६८-८६९




https://www.facebook.com/ShivajiRaje.co.in/photos/a.403658243129522.1073741826.403654463129900/752824458212897/?type=3&theater