११/११/२०१७

आठवणीचा पाऊस

आठवणीचा पाऊस
प्रतिनिधी
मुंबई
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षणांत येते सर सर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे ...
जून महिना सुरू झाला आणि पावसाला सुरुवात झाली. पावसाचे ते थेंब अंगावर हलकेच झेलताना मनाच्या कोनाड्यातील कित्येक आठवणी पल्लवित झाल्या आणि पावसाळ्यातल्या वातावरणासारख्याच धूसर झालेल्या कित्येक आठवणी ताज्या होऊन डोळ्यांसमोरून झरझर वाहू लागल्या.
प्रत्येकाची निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी आणि मांडण्याची पध्दत वेगवेगळी असली तरी सामान्य लोकांना भुरळ पाडणारी नक्कीच असते. हिरवाईचं समृद्ध लेणं ल्यायलेली सृष्टी, आकाशातील इंदधनुष्यामुळे झालेले सप्तरंगी विचार, विविध फुलांनी सजलेली धरणीमाता अशा विविध उपमांच्या आधारे मानवी जीवन आणि निसर्ग यांचा सहसंबंध जोडला जातो. कोणताही कवी निसर्ग नुसताच अनुभवत नाही किंवा त्यातल्या सौंदर्याचा आस्वाद घेत नाही तर तो जीवनाच्या व्यापकतेचा शोध घेत असतो.
विज कडाडते,ढग गडगडाट करतात आणि मग मस्त मातीचा वास सुटतो. थोड्याच वेळात जोराचा पाऊस सुरू होतो पावसाळ्याची ही सुरूवात मला खूप खूप आवडते. विज कडाडते तेंव्हा थोड घाबरायला होत,पण त्यानंतर येणार्या धोधो पावसात भिजायची मजा काही वेगळीच असते. सगळी मोठी माणसे ओरडतात पावसात जायला लागलो की, पण मी कुण्णाच न ऐकता पावसात जातो. सर्दी व्हायला नको म्हणून आई खसाखसा डोके पुसून देते गरम गरम आले घालून केलेला चहा देते .
मला पावसाळा खूप आवडतो .एकदा पाऊस पडायला लागला की रस्त्यावर पाणी वाहायला लागते जणू काय घराच्या समोर नदीच वाहू लागते. वळचणीला तर धबधबा पडत असतो. त्या धबधब्याखाली भिजायला तर खुप्पच मज्जा येते ! बाहेर पाणी साठले की मी जुन्या वह्यातली पाने फाडून होडी बनवतो बाईनी मागच्या वर्षीच होडी कशी बनवायची ते शिकवले आहे. मग होड्या बनवून त्या पाण्यात सोडायच्या त्या पुढे पुढे जायला लागल्या की त्यांच्या मागे पळायचे. रस्त्यावरचा चिखल सगळा कपड्यावर उडतो हातपायही चिखलाने भरून जातात पण मज्जा येते चिखलात खेळायला! थोडा ओरडा पडतो आईबाबांचा, पण तरी परत परत बाहेर पावसात खेळायला आवडतेच.
शाळेत असताना ’पावसाळा’ या विषयावर निबंध लिहिताना मी नेहमी बाल कवींच्या कवितेतील या ओळींनी निबंधाची सुरुवात करायचे. पाऊस ही अशी गोष्ट आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. तो सर्वांनाच हवाहवासा वाटतो. प्रत्येकाची पाऊस ’एन्जॉय’ करण्याची पध्द्त वेगवेगळी असली तरी तो आला की सगळेच आनंदुन जातात. पुर्वी लहान मुले पावसात होड्या सोडत बसायचे पण सध्या होड्या कमी दिसायला लागल्या; मुले व्हिडिओ गेमच खेळताना दिसायला लागले.

पाऊस आला कि कवी-कवयित्री, साहित्यिक, चित्रकार यांच्या विचारांची एक्स्प्रेस धावायला लागते. कोणत्या गोष्टीला कोणत्या ’उपमे’च्या डब्ब्यात टाकतील ते सांगता येत नाही. आपल्या भावना ते शब्दांमधे उतरवण्याचा प्रयत्न करतात; मग ती कविता असो, चित्र असो किंवा एखादा छोटासा लेख. आपल्या विचारांनी निसर्गाचे अनमोल सौन्दर्य त्यांच्याकडून शब्द, लेखणी, कुंचला यांच्याद्वारे कागदावर साकारले जाते. छायाचित्रकार ’युनिक’ फोटो शोधत बसतात. ते पावसातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या कॅमेर्यात कैद करतात. भिजणारी लोक, पावसाचा आनंद लुटणारी लहान मुले, एकाच छ्त्रीत फिरणारी प्रेमी युगुले, पावसाच्या मार्याने पडलेली झाडे अशा विविध विषयातून लोकांसमोर पावसाळा मांडतात.
पावसाळ्याची चाहूल लागली की ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी स्थळे शोधायला सुरुवात करतात. ट्रेकर लोक सिंहगड ते सह्याद्रीच्या सर्व रांगा तसेच छोटी मोठी जंगले, विविध घाट शोधुन शोधुन फिरत बसतात. पावसाळ्यातला प्रत्येक वीकएन्ड कुठल्या ना कुठल्या तरी गडावर ही मंडळी साजरा करतात. यातच भर पडते ती प्रेमवीरांची; ट्रेकर्स सारखी ही मंडळी देखील ठिकाणे शोधत बसतात. एकाच छ्त्रीखाली फिरत पावसाचा आनंद घेताना दिसतात. पावसात एकत्र आईसक्रीम, एखाद्या गडावर मक्याचे कणीस, खेकडा भजी, सीसीडी मध्ये गरमागरम कॉफी यांचा आस्वाद घेताना दिसतात. हेल्मेट न घालता, स्कार्फ न बांधता, रेनकोट न घालता बाईक ची राईड म्हणजे अफलातूनच!
ऑफिस सुटल्यावर बाईकवरून घरी जाणारी मंडळी पावसात मुद्दामच अमृततुल्यचा अनुभव घेताना दिसतात; गरमागरम भजी, सामोसा, चाट! अशा चहाच्या एका कपाने दिवसभरचे सगळे टेन्शन पळून जाते. नुसत्या नावाने आणि वासानेच खायची प्यायची इच्छा होते.


poonam.mane2209@gmail.com
9664850573

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search