जीवन म्हणाले उगा पंगा घेवू नको मजशी
नाकासमोर नीट चाल वाट हीच बावनकशी
पण मस्ती होती कुणास ठावूक कसली
जाणून बुजून मी आडवाटेस उडी घेतली
म्हाताऱ्या बॉस सारखे चरफडले जीवन
पावलोपावली दु;खाचे भेटू लागले आंगण
एकदा आडव्यात शिरल्यावर माघार कसली
म्हटलो साल्याची मस्ती पाहिजे जिरवली
प्रत्येक दु;ख मग कोळून पिवू लागले
तन मन जन्म सारा वेदनेचा डोह झाले
हळू हळू सोसतांना साहणेच धर्म झाला
क्षणोक्षणी विष देही पिंड विषकन्या झाला
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/