११/२९/२०१७

मटण हंडी




साहित्य

·       १ किलो मटणाचे तुकडे
·       ७ किसलेले कांदे
·       २ इंच आल्याची पेस्ट
·       मीठ
·       अर्धा चमचा साखर
·       ४ हिरव्या मिरच्या
·       १ चमचा कोथिंबीर
·       २ कप दही
·       १ लसणाची पेस्ट
·       अर्धा चमचा भाजलेली कसुरी मेथी
·       दीड चमचा लाल मिरची
·       १ चमचा हळद
·       २ बारीक केलेले टोमॅटो
·       १ चमचा गरम मसाला
पाककृती

·       प्रथम मटणाला अर्धी आलं-लसूण पेस्ट व दही लावून दोन तास ठेवा.
·       एका मातीच्या वा कॉपर बॉटमच्या हंडीत २ चमचे तेल गरम करून त्यात कांदे लाल होईस्तोवर परता.
·       त्यात लाल तिखट, हळद, कसुरी मेथी, गरम मसाला घालून परता.
·       त्यात उरलेली आले-लसूण पेस्ट, बारीक केलेले टोमॅटो, मटण व मीठ घालून परता.
·       झाकण लावून झाकणावर पाणी ठेवून मटण शिजू द्या. शेवटी साखर घालून ढवळा, वरून कोथिंबीर पेरा.
·       गरमागरम हंडी मटण जिरा राईस वा रोटीसोबत सर्व्ह करा.






संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)


लेखीका : मनाली पवार 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search