ठळक घटना आणि घडामोडी

 • १९२२ - आयरिश मुक्त राष्ट्राने लेखक आणि आयरिश रिपब्लिकन आर्मीचा सदस्य अर्स्किन चाइल्डर्स आणि इतर आठांना बेकायदेशीर रीत्या रिव्हॉल्वर बाळगल्याबद्दल गोळ्या घालून मृत्युदंड दिला.
 • १९४० - दुसरे महायुद्ध-स्लोव्हेकियाने अक्ष राष्ट्रांशी हातमिळवणी केली.
 • १९४३ - दुसरे महायुद्ध-यु.एस.एस. लिस्कोम बे या युद्धनौकेला टोरपेडो लागून बुडाली. ६५० ठार.
 • १९४३ - दुसरे महायुद्ध-टोक्योवर ८८ अमेरिकन लढाऊ विमानांनी हल्ला चढवला. जपानी राजधानीवर झालेला हा पहिलाच थेट हल्ला होता.
 • १९६३ - जॉन एफ. केनेडीचा खून करणाऱ्या ली हार्वे ऑसवाल्डचा डॅलस पोलिस स्थानकात जॅक रुबीने खून केला. योगायोगाने या प्रसंगाचे दूरचित्रवाणीवर देशभर प्रक्षेपण झाले.
 • १९६५ - जोसेफ डेझरे मोबुटुने काँगोमध्ये उठाव करून सत्ता बळकावली.
 • १९६६ - टॅब्सो फ्लाइट १०१ हे बल्गेरियाचे विमान चेकोस्लोव्हेकियाच्या ब्रातिस्लावा शहराजवळ कोसळले. ८२ ठार.
 • १९७१ - डी.बी. कूपरने नॉर्थवेस्ट ओरियेंट एरलाइन्सच्या विमानातून लुटीच्या दोन लाख अमेरिकन डॉलर सह पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारली. कूपरचा मागमूस आजतगायत लागलेला नाही.
 • १९७६ - तुर्कस्तानच्या पूर्व भागात झालेल्या भूकंपात ४,०००-५,००० मृत्युमुखी.

जन्म

 • १६५५ - चार्ल्स अकरावा, स्वीडनचा राजा.
 • १६९० - हुनिपेरो सेरास्पेनचा ख्रिश्चन धर्मप्रसारक.
 • १७८४ - झकॅरी टेलरअमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
 • १८५३ - बॅट मास्टरसन, अमेरिकन गुंड.
 • १८६९ - अँतोनियो ऑस्कार कार्मोनापोर्तुगालचा ९७वा पंतप्रधान आणि ११वा राष्ट्राध्यक्ष.
 • १८७७ - आल्बेन बार्कलीअमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
 • १८७७ - कावसजी जमशेदजी पेटीगरा, भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचा (सी.आय.डी.) कमिशनर.
 • १८८४ - इत्झाक बेन-झ्वीइस्रायेलचा राष्ट्राध्यक्ष.
 • १८८७ - एरिक फॉन मॅनस्टाईन, दुसर्‍या महायुध्दातील जर्मन सेनानी
 • १८८८ - डेल कार्नेगीअमेरिकन लेखक.
 • १८९४ - हर्बर्ट सटक्लिफइंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १८९९ - वन यिदुओचिनी भाषेमधील कवी, लेखक.
 • १९४६ - टेड बंडी, अमेरिकन मारेकरी.
 • १९५५ - इयान बॉथमइंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९६१ - अरुंधती रॉयभारतीय लेखक.
 • १९७८ - कॅथरिन हाइगल, अमेरिकन अभिनेत्री.

मृत्यू

 • ६५४ - सम्राट कोतोकूजपानी सम्राट
 • १८४८ - विल्यम लॅम्बयुनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
 • १९२९ - जॉर्जेस क्लेमेन्सूफ्रांसचा पंतप्रधान
 • १९६३ - मारोतराव कन्नमवारमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री
 • १९६५ - अब्दुल्ला तिसरा अल-सलीम अल-साबाहकुवैतचा अमीर
 • १९९१ - फ्रेडी मर्क्युरीब्रिटिश संगीतकार
 • २००९ - समाक सुंदरावेजथायलंडचा पंतप्रधानवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita