११/२३/२०१७

केदारेश्वराची गुहा


मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एक गुहा लागते, यालाच केदारेश्वराची गुहा असेही म्हणतात. या गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कंबरभर पाणी आहे. ही गुहा खरंतर चार खांबांवर तोलली होती, पण सद्य…स्थितीला एकच खांब शाबूत आहे. याच गुहेत एक खोली ही आहे .खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास बर्फतुल्य पाण्यातून जावे लागते. #हरिश्चंद्रगड #सह्याद्री

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search