११/२०/२०१७

दिनविशेष नोव्हेंबर २०




ठळक घटना आणि घडामोडी

विसावे शतक

  • १९१० - मेक्सिकन क्रांती - फ्रांसिस्को मदेरोने आपला प्लान दि सान लुइस पोतोसी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात त्याने राष्ट्राध्यक्ष पॉर्फिरियो दियाझवर टीका केली, स्वतःला राष्ट्राध्यक्ष घोषित केले व जनतेला सरकार उलथण्याचे आवाहन केले.
  • १९१७ - पहिले महायुद्ध-कॅम्ब्राईची लढाई - लढाईच्या सुरुवातीस ब्रिटिश फौजेने जर्मनीकडून मोठा भूभाग काबीज केला पण नंतर त्यांना माघार घ्यावी लागली.
  • १९१७ - युक्रेन प्रजासत्ताक झाले.
  • १९२३ - जर्मनीने आपले अधिकृत चलन पेपियेरमार्क रद्द केले व रेंटेनमार्क हे नवीन चलन सुरू केले. १ रेंटेनमार्कची सुरुवातीची किंमत होती १०,००,००,००,००,००० (१ हजार अब्ज किंवा १० निखर्व) पेपियेरमार्क.
  • १९४० - दुसरे महायुद्ध-हंगेरीरोमेनिया व स्लोव्हेकियाने अक्ष राष्ट्रांशी हातमिळवणी केली.
  • १९४३ - दुसरे महायुद्ध-तरावाची लढाई.
  • १९४७ - दुसरे महायुद्ध-न्युरेम्बर्गचा खटला सुरू झाला.
  • १९४७ - युनायटेड किंग्डमची भावी राणी राजकुमारी एलिझाबेथ व लेफ्टनंट फिलिप माउंटबॅटनचे लग्न.
  • १९६९ - व्हियेतनाम युद्ध-क्लीव्हलँड प्लेन डीलर या क्लीव्हलँडच्या दैनिकाने माय लाई कत्तलीची उघड चित्रे प्रसिद्ध केली.
  • १९७९ - सौदी अरेबियातील काबा मशीदीत सुमारी २०० सुन्नी लोकांनी ६,००० व्यक्तींना ओलिस धरले. सौदी सरकारने फ्रान्सच्या मदतीने हा उठाव हाणून पाडला.
  • १९८४ - सेटीची स्थापना.
  • १९८५ - मायक्रोसॉफ्टने मायक्रोसॉफ्ट विन्डोज १.० ही संगणक-प्रणाली प्रसिद्ध केली.
  • १९९३ - एव्हियोम्पेक्स या विमान कंपनीचे याक ४२-डी प्रकारचे विमान मॅसिडोनियातील ओह्रिड गावाजवळ कोसळले. ११५ ठार, १ व्यक्ती बचावली.
  • १९९४ - अँगोलाच्या सरकार व युनिटा क्रांतिकार्‍यांमध्ये झांबियातील लुसाका शहरात तह. १९ वर्षांचे गृहयुद्ध समाप्त.
  • १९९८ - अफगाणिस्तानमधील न्यायालयाने केन्या व टांझानियातील अमेरिकन वकिलातींवरील बॉम्बहल्ल्यात ओसामा बिन लादेन निर्दोष असल्याची ग्वाही दिली.
  • १९९८ - आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित.

एकविसावे शतक

  • २००३ - इस्तंबूलमध्ये अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. नोव्हेंबर १५ला झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर ५ दिवसांत झालेल्या या हल्ल्यात ब्रिटिश वकिलात तसेच हॉन्गकॉन्ग शांघाय बॅन्किंग कॉर्पोरेशन एच.एस.बी.सी. या बँकेचे तेथील मुख्यालय नष्ट झाले.
  • २०१६ - उत्तर प्रदेशमधील पुखरायण गावाजवळ इंदूर-राजेन्द्रनगर एक्सप्रेस रुळांवरुन घसरल्याने १५० ठार.

जन्म

  • २७० - रोमन सम्राट मॅक्सिमिनस
  • १७५० - म्हैसूरचा राजा टिपू सुलतान
  • १६०२ - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ ऑट्टो फोन ग्वेरिक
  • १६२५ - डच चित्रकार पॉलस पोर्टर
  • १७६१ - पोप आठवा पायस.
  • १७६५ - इंग्लिश दर्यासारंग सर थॉमस फ्रीमॅन्टल
  • १८४१ - कॅनडाचा सातवा पंतप्रधान विल्फ्रिड लॉरिये
  • १८५१ - इटलीची राणी मार्घेरिता
  • १८५४ - मराठी कवी, निबंधकार व नाटककार मोरो गणेश लोंढे
  • १८५८ - सेल्मा लॅगेर्लॉफस्वीडिश लेखक.
  • १८६४ - एरिक ऍक्सेल कार्लफेल्टस्वीडिश लेखक.
  • १८८९ - एडविन हबलअमेरिकन अंतराळशास्त्रज्ञ.
  • १८९६ - येवगेनिया गिन्झबर्गरशियन लेखक.
  • १९१० - विलेम जेकब व्हान स्टॉकमडच भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९२४ - बेनुवा मँडेलब्रॉटफ्रेंच गणितज्ञ.
  • १९२५ - रॉबर्ट एफ. केनेडीअमेरिकेचा सेनेटर.
  • १९४१ - हसीना मोइनउर्दू लेखक.
  • १९४२ - ज्यो बिडेनअमेरिकेचा सेनेटर.
  • १९४८ - जॉन आर. बोल्टन, अमेरिकेचा राजदूत.
  • १९६३ - इंग्लिश गणितज्ञ टिमोथी गॉवर्स

मृत्यू

  • १९१० - रशियन साहित्यिक लिओ टॉल्स्टॉय
  • १९७३ - केशव सीताराम ठाकरे

प्रतिवार्षिक पालन

नोव्हेंबर १८ - नोव्हेंबर १९ - नोव्हेंबर २० - नोव्हेंबर २१ - नोव्हेंबर २२ - (नोव्हेंबर महिना)

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search