११/०९/२०१७

भारतातल्या आईस्क्रीमचा रोमांचक इतिहास !

आईस्क्रीम हा पदार्थ जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात मिळेल. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणाऱ्या या पदार्थाचा इतिहास खूप मजेदार आहॆ. तसे तर विष्णूजींशी बऱ्याच पदार्थांवर बोलून झाले होते पण नेमक आईसक्रीम विषयी बोलायचं म्हणजे वेळ काढावा लागणार होता. पण त्यांची कमालच आहे, जी गोष्ट मला जरा कठीण वाटत होती त्यांनी ती, तर अगदीच सोपी करून दिली.
नागपूरच्या विष्णूजीच्या रसोईमध्ये खाटेवर बसून त्यांनी मला आईस्क्रीम विषयी खूप मनोरंजक गोष्टी सांगितल्या. "भारतात आईस्क्रीम ची सुरवात हि सॉर्बेच्या रूपात झाली. सॉर्बे म्हणजे बर्फाळ पाणी, त्यात तुंमच्या आवडत्या फळाचा रस किंवा त्याचे अगदी छोटे तुकडे आणि साखर एकत्र करून त्याला थंड करणे आणि असा हा फ्लेवर्ड बर्फ खाणे, याला म्हणतात सॉर्बे. पण पूर्वी हा हिंदुकुश भागातच म्हणजेच भारताच्या उत्तर दिशेतच जास्त मिळायचा. सॉर्बे हा पदार्थ मुघलांनी भारतात आणला. त्यावर मुघलांनी भरपूर प्रयोग केले. सुका मेवा आणि दूध हे हे नेहमीच मुघलांना जवळचे होते त्यांनी बर्फ़ाळ पाण्यात ते सगळं टाकून त्याची कुल्फी तयार केली आणि अश्या प्रकारे आपल्या कुल्फीचा जन्म झाला." हे सगळं ऐकताना मी ते मुघल शिपाई न त्यांची ती शाही कुल्फी कशी असेल ह्यात रमले. तेव्हा हि कुल्फी राजदरबारातील खास पदार्थ होता कारण त्याकाळी बर्फ हा सहज सहजी उपलब्ध नव्हता. कित्ती वाट बघावी लागत असेल नाही सगळ्यांना हिवाळ्याची फक्त एका कुल्फीसाठी!
आपण खरंच खूप भाग्यवान आहोत.(असं मला बापडीला वाटतं)असो, तर भारतात आईसक्रीम पहिल्यांदा कुल्फीच्या रूपात आल पण ते ग्रीक, पर्शिअन, रोमन आणि चायनाच्या खाद्य संस्कृतीत वेगवेगळ्या नावाने आणि रूपाने अस्तित्वात होत. ग्रीक संस्कृतीत थंडीच्या दिवसांमध्ये पडणाऱ्या बर्फ म्हणजे 'स्नो' मध्ये सहद आणि फळ टाकून त्याला खाल्ल जात असे, तर पर्शिअन लोक ह्यात प्रामुख्याने गुलाब पाणी, बारीक शेवया, फळ आणि सुका मेवा टाकून खायचे. यालाच ते फालुदा म्हणायचे, अन हा फालुदा आपण सगळे आजही आवडीने खातो.
रोमन संस्कृतीत बर्फावर फ़ळ आणि फळाचं रस मिसळून, त्याला एक गोड़ पदार्थ म्हणून खाल्ल्या जायचे. मात्र चायना मध्ये दूध आणि तांदुळाला एकत्र करून त्याचे थंड मिश्रण तयार करण्यात आले. या मिश्रणाला पाणी आणि मिठाच्या साहाय्याने मातीच्या मोठंमोठ्या बंबांमध्ये साठविण्यात आले होते. मात्र अकबरनामाचा लेखक आणि अकबरच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक अबुल फझल याच्या संकलनानुसार मीठ आणि पाण्याच्या मिश्रणात मातीचं भांड ठेऊन त्याला थंड करायची पद्धत मुघलांनी भारतात आणली आणि मग ती हळू हळू चायना मध्ये प्रसिद्ध झाली असे सांगण्यात आले आहे.
१६ व्या शतकात बर्फापासून बनणाऱ्या या पदार्थाला विशेष मानण्यात आले हे खरे. विष्णूजींनी पुढे सांगितले कि पहिले आईस्क्रीम कुठे तयार करण्यात आले हे सांगणे खूप कठीण आहे कारण, जिथे जिथे बर्फ होता तिथे तिथे पहिल्यापासून कुठला ना कुठला पदार्थ बनत आला होता. पण असे म्हणतात कि, आईस्क्रीम ला प्रसिद्धी १७ व्या शतकात मिळाली. इटली आणि इतर भागांमध्ये आईसक्रीम चे आप-आपले प्रकार बनविल्या जात होते मात्र युरोप मध्ये चार्ल्स राजा-१ च्या जेवणात हा पदार्थ आवर्जून बघण्यात आला होता. इटालियन राणी कैथरीनने जेव्हा फ्रांस मधील हेनरी राजा-२ सोबत लग्न केल, कदाचित तोच काळ असावा जेव्हा युरोप मध्ये आईसक्रिम जास्त प्राणात वापरल्या जाऊ लागले. कारण इटली मध्ये सोबत हा प्रकार प्रसिद्ध होता. जगातील पहिले 'आईस्क्रीम केफे' पॅरिस मध्ये १७ व्या शतकाच्या सुरवातीस उघडल्या गेले. त्यानंतर ह्यात कालांतराने बदल होत गेले आणि तंत्रज्ञान जसजसे विकसित झाले तसतसे आईसक्रीम चे स्वरूप हि बदलत गेले. पण काळाच्या ओघात कायम राहिले ते या पदार्थाविषयीचे प्रेम. किंबहुना आईस्क्रीम विषयीचे प्रेम वाढतच गेले असे म्हणायला हरकत नाही. आज आईस्क्रीमचे कितीतरी फ्लेवर जगभाऱ्यात उपलब्ध आहेत.
- श्यामली निंबाळकर-नागपूरकर
https://www.facebook.com/Amhichtevede/posts/1897750270240682

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search