११/०७/२०१७

कधीतरी !!


वाटेल खंत तुला मी नसल्याची कधीतरी !

बोचतील काटे घेता सुखाची झोप कधीतरी !
चाळताना पूर्वायुष्य गुलाबी पानांचे
सापडेल गुलाबाची पाकळी कधीतरी!
जरी गाठले शिखर आयुष्याचे तरीही,
जाणवेल कमी माझी तुला कधीतरी !
असशिल सुखाच्या नशेत तरळताना,
होशील अस्वस्थ आठवणीनी माझ्या कधीतरी !
ओघळशील दोन आसवे आठवांची आपुल्या,
हाय! घायाळ होशील मनाने तू कधीतरी ! 
माळताना गजरा केसात तव करांनी,
गळेल एक फुल माझ्या आठवणींचे कधीतरी !
श्री.प्रकाश साळवी.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search