११/२७/२०१७

बाकरवडी


साहित्य

·       २ कप मैदा
·       २-३ मोठे चमचे बेसन
·       चवीपुरते मीठ
·       १ ते दीड चमचा तेल
·       १ छोटा चमचा ओवा
·       सारणासाठी
·       १ मोठा चमचा बेसन
·       १ छोटा चमचा तीळ आणि खसखस
·       १ छोटा चमचा आले किसून
·       १ ते दीड चमचा लसूण पेस्ट
·       ३ चमचे लाल तिखट
·       १ ते दीड चमचा पिठीसाखर
·       १ छोटा चमचा गरम मसाला
·       १ चमचा धनेपूड
·       १ छोटा चमचा बडीशेप
·       १ चमचा किसलेले सुकेखोबरे
·       ३-४ मोठे चमचे बारीक शेव
·       मीठ
पाककृती

·       मैदा आणि बेसन एकत्र करून त्यात मीठ आणि ओवा घालावा. तेल गरम करून पीठात घालावे आणि पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. आणि झाकून १५-२० मिनिटे बाजूला ठेवावे.
·       तीळ आणि खसखस तव्यावर थोडी भाजून घ्यावी.
·       सारणासाठी दिलेले सर्व पदार्थ, तीळ, खसखस एकत्र करून १ चमचा तेलावर थोडे परतून घ्यावे.
·       सारण तयार झाल्यावर भिजवलेल्या मैद्याची एक पातळ पोळी करून १-२ चमचे सारण त्यावर समान पसरावे.आणि घट्ट रोल करावा.. (जर रोल घट्ट नाही झाला तर त्यातील सारण बाहेर येते.)
·       सुरीने १ इंच आकाराचे तुकडे करावे.
·       गरम तेलामध्ये गोल्डन ब्राउन तळून घ्यावेत.
·       बाकरवडया थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवाव्यात.



संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवार 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search