११/२८/२०१७

बेसन पोळी

साहित्य

·       एका नारळाचं खोवलेलं खोबरं
·       तेवढीच साखर
·       दोन छोटे चमचे दूध
·       अर्धी वाटी बेसनपीठ
·       एक वाटी लाडू रवा
·       एक चमचा मैदा
·       तेल
·       चवीपुरतं मीठ
पाककृती

·       खोबरं, साखर आणि दूध एकत्र करून विरघळवून गॅसवर गरम करून सारण तयार करून घ्या.
·       वेगळ्या भांड्यात अर्धी वाटी बेसन थोड्याशा तेलावर भाजून घ्या. ही दोन्ही मिश्रणं साधारण अर्धा तास गरम होण्यासाठी वेगळी ठेवा.
·       लाडू रवा, मैदा एकत्र करून त्यात तेल आणि मीठ घालून त्याची कणीक भिजवून ठेवतो तशी अर्धा तास भिजवून घ्या.
आधीचं खोबऱ्याचं आणि बेसनाचं सारण एकत्र करून घ्या.
·       कणकेची पारी करून त्यात सारण भरा. फुलक्याएवढी पोळी लाटा आणि तव्यावर खमंग भाजा. भाजताना वरून तूप सोडल्यास पोळी आणखी खुसखुशीत होते.संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)


लेखीका : मनाली पवार 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search