११/२२/२०१७

दिनविशेष नोव्हेंबर २२
ठळक घटना आणि घडामोडी

पाचवे शतक

 • ४९८ - पोप अनास्तासियस दुसर्‍याच्या मृत्यूनंतर रोमच्या लॅटेरन महालात सिमाकसची तर सांता मारिया मॅजियोर येथे लॉरेन्शियसची पोपपदी निवड झाली.

नववे शतक

 • ८४५ - ब्रिटनीच्या राजा नॉमिनोने फ्रँकिश राजा टकल्या चार्ल्सचा पराभव केला.

अठरावे शतक

 • १७१८ - रॉबर्ट मेयनार्डने समुद्री चाचा एडवर्ड टीच तथा ब्लॅकबीयर्डच्या जहाजावर हल्ला करून त्याला यमसदनी धाडले.

एकोणिसावे शतक

 • १८३० - चार्ल्स ग्रे युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
 • १८५८ - डेन्व्हरकॉलोराडो शहराची स्थापना.

विसावे शतक

 • १९२२ - हॉवर्ड कार्टर आणि लॉर्ड कॅर्नार्व्होननी तुतनखामनची कबर उघडली.
 • १९३५ - चायना क्लिपर हे विमान अलामेडा, कॅलिफोर्नियाहून आपल्या पहिल्या सफरीवर निघाले. मनिलाला पोचायला त्याला एक आठवडा लागला.
 • १९४२ - दुसरे महायुद्ध-स्टालिनग्राडची लढाई - जनरल फ्रीडरिश पॉलसने अ‍ॅडॉल्फ हिटलरला जर्मन सैन्य पूर्णपणे वेढले गेल्याने मदत पाठवण्यासाठी तार पाठवली.
 • १९४३ - दुसरे महायुद्ध-कैरो बैठक.
 • १९४३ - लेबेनॉनला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
 • १९६३ - डॅलस, टेक्सास येथे अमेरिकेच्या जॉन एफ. केनेडीची हत्या. लिंडन बी. जॉन्सन राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९७५ - फ्रांसिस्को फ्रँकोच्या मृत्यूनंतर हुआन कार्लोस स्पेनच्या राजेपदी.
 • १९७७ - ब्रिटीश एरवेझने लंडन ते न्यू यॉर्क काँकोर्ड या स्वनातीत विमानाची सेवा सुरू केली.
 • १९८८ - पामडेल, कॅलिफोर्निया येथे सगळ्यात पहिल्या बी-२ स्पिरिट या स्टेल्थ[मराठी शब्द सुचवा] विमानाचे अनावरण.
 • १९८९ - वेस्ट बैरुत येथे लेबेनॉनच्या राष्ट्राध्यक्ष रेने मोआवादची बॉम्बस्फोटात हत्या.
 • १९९८ - आल्बेनियाने नवीन संविधान अंगिकारले.
 • २००२ - नायजेरियामध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार.
 • २००५ - एंजेला मर्केल जर्मनीची सर्वप्रथम स्त्री चान्सेलर झाली.

जन्म

 • १६४३ - रॉबर्ट कॅव्हेलिये दि ला सालफ्रेंच शोधक.
 • १७१० - विल्हेल्म फ्रीडमन बाखजर्मन संगीतकार.
 • १७२२ - ह्रिहोरी स्कोवोरोदायुक्रेनियन कवी.
 • १८०८ - थॉमस कूकब्रिटिश प्रवासयोजक.
 • १८१९ - जॉर्ज इलियटइंग्लिश लेखक.
 • १८६८ - जॉर्ज नान्स गार्नरअमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
 • १८६९ - आंद्रे गिदेनोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक.
 • १८७७ - एंद्रे ऍडीहंगेरियन कवी.
 • १८९० - चार्ल्स दि गॉलफ्रेंच राष्ट्राध्यक्ष.
 • १८९८ - वायली पोस्टअमेरिकन वैमानिक.
 • १८९९ - होगी कारमायकेलअमेरिकन संगीतकार.
 • १९०१ - होआकिन रोद्रिगोस्पॅनिश संगीतकार.
 • १९०४ - लुई युजिन फेलिक्स नेइलनोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९१३ - बेंजामिन ब्रिटनब्रिटिश संगीतकार.
 • १९१४ - पीटर टाउनसेंडब्रिटिश वैमानिक.
 • १९२१ - रॉडनी डेंजरफील्डअमेरिकन अभिनेता.
 • १९३९ - मुलायमसिंह यादवउत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री.
 • १९४३ - बिली जीन किंगअमेरिकन टेनिस खेळाडू.
 • १९६७ - बोरिस बेकरजर्मन टेनिस खेळाडू.
 • १९७० - मार्व्हन अटापट्टूश्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९२१ - स्कार्लेट योहान्सनअमेरिकन अभिनेत्री.
 • १९८८ - सुरेश गुप्तारा व ज्योती गुप्ताराजुळे इंग्लिश लेखक.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search