११/१७/२०१७

मुंबई का भाई कोण...?


मुंबई का भाई कोण...?
म्हणणारे हजारो आले 
आणि वाऱ्यासोबत 
उडून गेले....!!!
" ये बंबई मेरी मेहबूबा है....." म्हणत तिच्यावर राज्य
करण्यासाठी आलेले कित्येक सुलतान मिर्झा पण इथल्याच 
मातीत गाडले गेले ... ....!!! 
माया भाई
मन्या भाई 
सारखे भाई तर पोलिसांनी किलो किलोने
गल्लीगल्लीत कुत्र्या सारखे एन्काऊंटर करून मारले.....!!
आणि स्वताला मुंबईचा डॉन म्हणवणारे शेपूट
घालून इकडे तिकडे पळत आहे....!!
शेकडो आले आणि गेले ..
पण मुंबईने एकच राजा पहिला
ज्याने आपल्या साऱ्या आयुष्यभर मुंबईवर 
राज्य केले... !!..
ज्याचा बोटांच्या तालावर सगळी मुंबई नाचत
राहिली....!! 
तो चालायला लागला.... 
तर मोर्चे निघत.... 
आणि 
उभा राहिला तर 
लाखोंच्या सभा .....!!
चकरी सारखी कायम गरगर फिरणारी मुंबई थांबण्याची ताकद जर कोणात होती 
तर ती फक्त त्याच्या 
हाताच्या एका इशाऱ्यात ......!!!
तो राजा सारखा राहिला.....
आणि 
राजा सारखा जगला ....!! 
त्याने देहात प्राण असे पर्यंत 
तर मुंबई वर राज्य केलच..... पण 
त्याचा दरारा इतका होता कि त्याच्या निष्प्राण देहाने सुद्धा प्राण नसताना एक पूर्ण दिवस 
मुंबई बंद
करून दाखवली.....!!
त्या मुंबईच्या 
राजाला मानाचा मुजरा......!!

फक्त 
बाळासाहेब ठाकरे
हिंदू हृदय सम्राट !!

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search