११/२४/२०१७

बटर चिकन


लागणारे साहित्य:

एक  किलो तंदुरी चिकन, तीस  ग्रॅम लोणी, एक  चमचा तेल, एक  चमचा जिरं, २५० ग्रॅम टोमॅटो प्युरी, चवीनुसार  मीठ, १५० ग्रॅम क्रीम, एक हिरवी मिरची चिरलेली आणि कोथिंबीर.


कसे तयार कराल:

आधी चिकनचे आठ ते दहा तुकडे करावे.आता तेल व लोणीला गरम करून जिऱ्याची फोडणी द्यावी नंतर टोमॅटो प्युरी टाकावी त्या नंतर दोन मिनिट ढवळून चिकनचे तुकडे टाकावे आता आठ-दहा मिनिट शिजवावे.त्या नंतर क्रीम घालून एकजीव करावे व दोन मिनिट उकळावे. बटर चिकन तयार.डिशमध्ये काढून वरून कोथिंबीर व मिरच्यांचे तुकडे घालून सर्व्ह करावे.


संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवार 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search