लागणारे साहित्य:
पाच ते सहा मोठे
बटाटे,तळण्यासाठी तेल आणि चवीपुरते मीठ
कसे तयार कराल:
आधी बटाटे सोलून घ्यावे आणि एक सेमी जाडीचे उभे तुकडे करून घ्यावे.हे तुकडे पाण्यात बुडवून ठेवावे आणि हलकेच चोळून घ्यावे नंतर पाणी काढून टाकावे बटाट्याचे काप स्वच्छ कापडावर काढून ठेवावे. आता तेल कढईत तापवावे. तेल तापले की गैस मध्यम करावा. बटाट्याचे काप तीन ते चार विभागात तळावे. एकाच वेळी सर्व काप तेलात घालू नयेत.फ्राइज गोल्डन रंग होई पर्यंत तळावे.तळून झाल्यावर वरून मीठ टाकून सौस बरोबर सर्व करावे.
संदर्भ: Facebook share
लेखक : anonymous